| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ जानेवारी २०२५
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे सन २०१८-१९, सन २०१९-२० व सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील अभिलेख्याचे लेखापरिक्षण होणार असून, याकरिता सहा. संचालक तथा पथक प्रमुख श्री. विजय पाटील व त्यांचे पथक महापालिकेत दाखल झाले. महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी लेखापरीक्षण पथकाचे स्वागत केले.
मुख्य लेखा परीक्षक शिरीष धनवे यांनी विभाग प्रमुख यांच्याशी संवाद साधून लेखा परीक्षण बाबत सतर्क राहण्याबाबत सूचित करून लेखा परिक्षणा बाबत सर्व दक्षता घेऊन वेळेत अभिलेख देण्याचे आहे. अशा सूचना आयुक्त शुभम गुप्ता यांनी सर्व खात्यांच्या दिल्या आहेत..
याबाबत आवाहन करताना आयुक्त शुभम गुप्ता म्हणाले की, लेखा परीक्षण साठी आवश्यक सर्व अभिलेख उपलब्ध करून देणे गरजेचे असून, ते सर्व विभाग प्रमुख यांनी लेखा परीक्षण टीम यांना सत्वर त्यांच्या मागणीनुसार उपलब्ध करून देणेचे आहे . मुदतीत लेखा परीक्षण पूर्ण करण्यासाठी सर्व विभाग प्रमुख यांनी प्रयत्न करण्याचे आहेत.
या वेळी अति आयुक्त रविकांत अडसूळ, निलेश देशमुख उप आयुक्त वैभव साबळे, विजया यादव सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.