| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ जानेवारी २०२५
सांगली येथे समाजाच्या हितार्थ स्थापन झालेल्या एमबीए संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त, छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत, झी टॉकीज फेम कीर्तन सिंधू ह. भ. प. श्री. सागर महाराज बोराटे (नातेपुते) यांचा सुश्राव्य नाम संकीर्तन सोहळा सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यमंदिर मध्ये सायंकाळी सहा वाजता संपन्न होत आहे.
याचवेळी एमबीए संस्थेच्या महिला वर्धापन दिनानिमित्त, विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या स्त्री शक्तीचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकू व वाण वाटपाचे आयोजन हे करण्यात आले आहे. विष्णुदास भावे नाट्य मंदिरात आज दिनांक 16 जानेवारी रोजी दुपारी तीन ते सहा या दरम्यान हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या दोन्ही कार्यक्रमास सांगलीतील नागरिकांनी व महिलांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे, असे आवाहन विजयसिंह चव्हाण व अक्षय साळुंखे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.