yuva MAharashtra अखेर वाल्मीक कराड वर लागला मोका, संतोष देशमुख याच्या गुन्हेगारीला लागणार ब्रेक !

अखेर वाल्मीक कराड वर लागला मोका, संतोष देशमुख याच्या गुन्हेगारीला लागणार ब्रेक !

फोटो सौजन्य  - गुगल फोटो गॅलरी

| सांगली समाचार वृत्त |
केज  - दि. १५ जानेवारी २०२५

बीड मधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित व खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या बहुचर्चित वाल्मिक कराड याला मोक्का लावण्यात आला आहे. त्याआधी कोर्टाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान एसआयटीचे अधिकारी वाल्मीक कराडला घेऊन मोक्का कोर्टात गेले असून, हत्याचा कट रचल्याने कराड विरोधात मोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी केली.

यादे हत्या प्रकरणात आठ आरोपीवर मोक्का लावण्यात आला आहे यामध्ये सुदर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे, जयराम चाटे,श सुधीर घुले, प्रतीक घुले, कृष्णा आंधळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांचा समावेश आहे.

दरम्यान वाल्मिक कराड याला सीआयडीने ताब्यात घेतल्यानंतर पहिल्यांदाच वाल्मिकच्या कोठडीवर कोर्टामध्ये युक्तिवाद झाला. कराडचे कोठडी मुदत संपत असल्याने, त्याला केज येथील कोर्टात हजर करण्यात आले होते यावेळी सरकारी वकिलांनी कराडचे हलके दहा दिवस कोठडी द्यावी अशी मागणी केली तर कराडच्या वकिलांनी सरकारी वकील वर प्रश्नांची सरबत्ती केलीयाचे कोर्टात पहाण्यास मिळाले.


संतोष देशमुख यांच्या हत्येत आरोपीचा सहभाग तपासावयाचा असून, त्यासाठी दहा दिवसांची सीआयडी कोठडी द्या, असा युक्तीवर सरकारी वकिलांनी केला. वाल्मीक कराडचे व्हाईस सॅम्पल घेतल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी यावेळी कोर्टाला दिली, तसेच सरकारी वकिलांनी देशाबाहेरील आणि देशात वाल्मीक कराडने मालमत्ता जमविली असून, त्याचा तपास करावयाचा असल्याचेही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. त्याचप्रमाणे ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात तपास करावयाचा असल्याने दहा दिवसांच्या कोठडीचे मागणी केली. 

यावर आरोपी वाल्मिक कराडच्या वकीलांनी त्याची बाजू मांडताना सीआयडी कोठडी न देता न्यायालयीन कोटीची मागणी केली. तसेच सगळा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संपत्तीची माहिती घेण्यासाठी पोलीस कुठली का लागते असा सवाल केला. यावेळी सरकारी वकिलांनी आरोपीने इतर कोणाच्या नावावर संपत्ती खरेदी केली आहे का याचा देखील तपास करावयाचे कोर्टाला सांगितले. तेव्हा वकिलांनी आरोपीला पंधरा दिवसांची पोलीस कोठडी पुरेशी असून सर्व मुद्देमाल जप्त केल्याने संपत्तीची माहिती घेण्यासाठी पोलीस कोठडीची गरज नाही त्यामुळे सोनवावी अशी मागणी कोर्टासमोर केली. अखेर कोर्टाने आरोपी वाल्मीक कराड याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.