yuva MAharashtra नितेश राणे यांच्या सांगलीतील इशाऱ्यानंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने विशाळगडावरील ऊरसास केली बंदी !

नितेश राणे यांच्या सांगलीतील इशाऱ्यानंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने विशाळगडावरील ऊरसास केली बंदी !

फोटो सौजन्य  - गुगल फोटो गॅलरी

| सांगली समाचार वृत्त |
कोल्हापूर - दि. ११ जानेवारी २०२५
गेली अनेक वर्षे कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे बाबा मलिक रेहान मिरासाहेब पुरुष संपन्न होत होता. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदपावन स्पर्शाने पवित्र झालेल्या विशाळगडावर सुरू असलेला हा ऊरुस बेकायदा असून, त्याला बंदी घालावी व विशाळगडावरील सर्व बेकायदा अतिक्रमणे हटवावीत या मागणीसाठी काही महिन्यापूर्वी माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी विशाळगड व कोल्हापूर येथे जोरदार आंदोलन केले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. मात्र वातावरण निवळल्यानंतर प्रशासनाने विशाळगडावर संचारबंदी जारी केलेली ही संचारबंदी हटवण्यात आली होती. त्यामुळे रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी किल्ले विशाळगडावर धार्मिक कार्यक्रमाच्या अडून ऊरुसाचे नियोजन करण्यात आले होते.


या पार्श्वभूमीवर काल सांगली येथे संपन्न झालेल्या हिंदू गर्जना मेळाव्यात मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी, " विशाळगडावर पुरुष कसा होतो ते पाहतोच" अशी गर्जना केली होती. या इशाऱ्यानंतर संभाव्य परिस्थितीचा अंदाज घेऊन कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने विशाळगडावरील सर्व कार्यक्रमावर बंदी घातली असून जमाबंदी ही लागू केली आहे. त्यामुळे तथाकथित ऊरुसही होणार नसल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी आनंद व्यक्त केला आहे.