yuva MAharashtra द ग्रेट क्रिकेटर सौरभ गांगुलीच्या कन्येची दबंगगिरी, कारला ठोकून पाळणाऱ्या बस ड्रायव्हरचा पाठलाग करून पकडले !

द ग्रेट क्रिकेटर सौरभ गांगुलीच्या कन्येची दबंगगिरी, कारला ठोकून पाळणाऱ्या बस ड्रायव्हरचा पाठलाग करून पकडले !

                  फोटो सौजन्य  : गुगल स्रोत

| सांगली समाचार वृत्त |
कोलकत्ता - दि. ५ जानेवारी २०२५
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व क्रिकेटच्या मैदानात जगभरातील दिग्गज गोलंदाजांना आपल्या बॅटने पाणी पाजणारा दबंग क्रिकेटपटू म्हणून सौरव गांगुली जगप्रसिद्ध... क्रिकेटच्या मैदानावरील त्याचे अनेक किस्से आजही चविने वाचले व ऐकले जातात... आता त्याच्या लेकीने अशीच दबंग कामगिरी करून प्रसिद्धी मिळवली आहे. पण ती क्रिकेटच्या मैदानावर नव्हे तर कोलकत्त्याच्या एका रस्त्यावर...

याबाबत अधिक माहिती अशी की सौरव गांगुली याची लेक सना गांगुली कोलकत्यातील बेहाला चौरस्ता परिसरातील डायमंड हार्बर मार्गावरून आपल्या कार मधून प्रवास करीत होती. त्यावेळी पाठीमागून आलेल्या एका बसने तिच्या कारला धडक दिली. यानंतर तो बस चालक थांबण्याऐवजी, पळून जात होता. तेव्हा गांगुलीची लेक सना आणि तिच्या ड्रायव्हरने त्या बसचा ड्रायव्हरचा पाठलाग करून साखर बाजार परिसरात अडवलं आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं. या अपघातात सना गांगुली अथवा तिच्या ड्रायव्हरला दुखापत झाली नसली तरी सणाच्या मर्सिडीज बेंज कारचे किरकोळ नुकसान झाले...


अन्याय झाल्यानंतर तो सहन न करता त्या विरोधात आवाज उठवणाऱ्या आपल्या पित्याप्रमाणेच सनानेही अपघात करून पाळणाऱ्या बस ड्रायव्हरला पकडून पोलिसांच्या हवाली केल्याने सना गांगुलीचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.