| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ जानेवारी २०२५
देशासाठी बुद्धी आणि विद्या दोन्ही आवश्यक असते. बुद्धी उपजत असते विद्या शिकवली जाते. जगातील सर्वाधिक बुद्धिमानाला विधान भर म्हणतात भगवान आदिनाथ तीर्थंकर हे महाविदामबर होते. जैन भिक मागत नाही. जैन समाजाने देशाला दिले आहे, तो देशाकडून घेत नाही हा इतिहास आहे. समाजाचे रक्षण होणार नसेल तर धर्माची रक्षणही होणार नाही, असे प्रतिपादन प. पू. आचार्य विशुद्ध सागर महाराज यांनी केले. नांदणी येथे पंचकल्याण महामहोत्सवाच्या चौथ्या दिवशी भगवंतांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला, यावेळी प्रवचनातून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या राज्याभिषेकांमध्ये छप्पन देशांच्या राजांचे आगमन, त्यांच्याकडून राज्याभिषेकावेळी नजराणा अर्पण, राज तिलक, राज्यसभा, शास्त्र सभा हे धार्मिक कार्यक्रम पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होती. आजच्या कार्यक्रमाला मिरवणुकीने प्रारंभ होऊन जलकुंभ आणण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर त्यागींचे प्रवचन झाले. भगवंतांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी आचार्य विशुद्धसागर महाराज यांचे प्रवचन झाले.
यावेळी प्रवचन सांगताना आचार्य विशुद्धसागर महाराज म्हणाले, भगवान आदिनाथ तीर्थंकरानी त्या काळात पुरुष व स्त्रियांना समान अधिकार दिले. आपल्या मुला मुलींना शिक्षण देण्याची जबाबदारी आई वडिलांची आहे तसेच त्यांना संस्कारित करण्याची जबाबदारी आहे. माझ्या सत्तेचाळीस वर्षाच्या दीक्षा काळात सर्व सर्व जातीपातीचे लोक एकत्र येऊन कार्यक्रम करतात हे पहिल्यांदा घडते आहे.
आज मठाधिपती स्वस्तिश्री जिनसेन महास्वामी यांच्या उपस्थित व शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याहस्ते उपस्थितीत मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. आजच्या कार्यक्रमासाठी आम. विनय कोरे, आम. अशोकराव माने, माजी आम. वीरकुमार पाटील, घोडावत ग्रुपचे उद्योगपती संजय घोडावत, मयूर संघाचे डॉ. संजय पाटील, कर्नाटकचे आम. सौदी, संजय पाटील - यड्रावकर, अरिहंत ग्रुपचे उद्योजक उत्तम पाटील यांचे परिवार, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष ललित गांधी, यवतमाळ चे उपजिल्हाधिकारी सुधीर पाटील आदी उपस्थित होते.