| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ८ जानेवारी २०२५
आज संपूर्ण राज्याचे राजकीय वातावरण ढवळून टाकणाऱ्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील घटनेत त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली आहे याचिका मागे घेण्याच्या निर्णयाने आश्चर्य व्यक्त होत आहे.
बीड मधील राजकीय गुन्हेगारीला राजकीय वरदहस्त असून त्याला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ मंत्रीपदावरून दूर करण्यात यावे, अशा प्रकारची याचिका मस्साजोगचे सरपंच धनंजय देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती.
या याचिकेत वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांच्याच असलेले जवळचे संबंधाचे महत्त्वाचे पुरावे व फोटो याची की सोबत जोडण्यात आला होते. त्याचप्रमाणे बीडमध्ये आमदारांनी विधानसभेत केलेल्या वाटणाचा संदर्भही देण्यात आलेला होता. धनंजय मुंडे यांचा राजीनामा न घेतल्यास तपास कामावर त्याचा विपरीत परिणाम होईल असेही याचिकेत नमूद करण्यात आले होते.
मात्र काल अचानक धनंजय देशमुख यांनी औरंगाबाद खंडपीठातील ही याचिका मागे घेतली आहे. संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणी राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे. तसेच वाल्मिकी कराड याला अटक ही करण्यात आली आहे त्यामुळे पोलिसांच्या तपासावर आपण समाधानी असल्याचे अर्जात नमूद करून ही याचिका मागे घेण्यात आली आहे.
धनंजय देशमुख यांनी अचानक ही याचिका मागे घेतल्याने त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का ? संतोष देशमुख यांचा तपास निष्पक्षपणे होणार का ? या हत्या प्रकरणात जबाबदार असलेल्या आरोपींना शासन होणार का ? असे प्रश्न निर्माण होत आहेत. मात्र पोलीस व तपास यंत्रणा आपल्या परीने योग्य तपास करीत असल्याने त्यावर शंका घेण्याची कोणतेही कारण नाही, असे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या प्रकरणात जबाबदार असलेल्या हत्यारांना योग्य ते शासन न्यायालय देईल, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.