| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ जानेवारी २०२५
सांगली जिल्हा काँग्रेसेवादलाच्या वतीने २५ जानेवारी २०२५ रोजी जय बापू जय भीम जय संविधान जय काँग्रेस या विषयावर एक दिवशी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. काँग्रेस भवन सांगली येथे काँग्रेस सेवा दलाची कार्यशाळा शिबिरात महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती सेलचे समन्वयक डॉ नामदेव कस्तुरे यांच्या जय संविधान जय बापू जय भीम जय काँग्रेस या विषयावर व्याख्यानाने सुरुवात झाली. यावेळी बोलताना डॉ कस्तुरे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भारताला एक सम्यक संविधान देऊन काँग्रेसने प्रजासत्ताक लोकशाहीचा पाया मजबूत केला आहे. आज सर्व भारतीय एकसंघपणे वाटचाल करीत आहोत, याचे कारण भारतीय संविधान देशाला महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचारच तारू शकतो, असे आपल्या मनोगतात व्यक्त केले.
यावेळी स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी केले. ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अशोकसिंग राजपूत, सेवा दलाचे सहजिल्हाध्यक्ष पैलवान प्रकाश जगताप, कार्याध्यक्ष अनिल मोहिते, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश घारगे, गुलाबराव भोसले, विठ्ठलराव काळे, मीना शिंदे, शमशद नायकवाडी, कडेगावचे अजित करांडे, पलुसचे सुशांत जाधव
इत्यादी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पहिले सत्र संपले.
दुपारच्या सत्रांमध्ये डॉक्टर विनोद पवार सांगली यांनी संविधानाच्या जनजागृती बाबत आपले विचार मांडले. यावेळी बोलताना त्यांनी, कायदा संविधान हे तीन स्तंभावर उभे राहिलेले आहे. विधिमंडळ कार्य पालिका व न्याय पालिका एक ते तीन स्तंभ आहेत. संविधानामुळे आपल्याला आर्थिक सामाजिक व राजकीय न्याय मिळाला आहे. संविधानामध्ये आपल्याला संधीची समानता बंधुता लोकशाही स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला आहे. संविधान बनवण्यासाठी डिसेंबर 1946 ला संविधान सभेची घोषणा झाली. सदर संविधान उद्दिष्टांचा ठराव नंतर संविधान पूर्ण होण्यास दोन वर्षे 11 महिने 18 दिवस लागले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी सदरचे संविधान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांना सुपुर्द केले. या घटनेला आज 75 वर्षे पूर्ण होत आहेत, असे विचार आपल्या मनोगतामध्ये डॉक्टर विनोद पवार यांनी मांडले.
यावेळी जिल्हाध्यक्षअजित ढोले, शहराध्यक्ष पै प्रकाश जगताप, ओबीसी सेलचे अशोकसिंग राजपूत, कार्याध्यक्ष अनिल मोहिते, सुरेश घारगे, गुलाबराव भोसले, अजित कारंडे, हनुमंत करांडे, सुशांत जाधव, रामसिंग परदेशी, विठ्ठलराव काळे, भीमराव चौगुले, महिला सेवा दलाच्या अध्यक्षा प्रमिला महाडिक, मीना शिंदे, कलावती निकम, शमशाद नाईकवाडी, प्रथमेश शेटे, सुरेश गायकवाड, शैलेंद्र पिराळे, गणेश वाघमारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.