yuva MAharashtra पाच जानेवारी रोजी सांगलीत भारतीय जनता पक्षाची मोठ्या प्रमाणावर सभासद नोंदणी !

पाच जानेवारी रोजी सांगलीत भारतीय जनता पक्षाची मोठ्या प्रमाणावर सभासद नोंदणी !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ४ जानेवारी २०२५
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने अभूतपूर्व यश प्राप्त केल्यानंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्हा परिषद ते ग्रामपंचायत अशा सर्वच संस्थांवर भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणजे 'भाजपाचा कार्यकर्ता वाढवणे'... यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण देशभर सभासद नोंदणीचे काम हाती घेतले आहे. ५ जानेवारी ते १२ जानेवारी या आठवड्यामध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणावर सभासद नोंदणी करण्याचे उद्दिष्ट भारतीय जनता पक्षाने ठरवले आहे. 

त्या अंतर्गत सांगली आणि मिरज विधानसभा मतदारसंघांमध्ये दिनांक ५ जानेवारी रविवारी संपूर्ण दिवसभर प्रत्येक बुथवर सभासद नोंदणीचे काम मोठ्या प्रमाणावर होणार आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात ३१५ बूथ आणि मिरज विधानसभा मतदारसंघात ३०७ बूथ अशा एकंदर ६२२ बुथवर, बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, पन्ना प्रमुख यांच्या बरोबरीने सर्व जिल्हा कार्यकारिणी सदस्य आजी-माजी नगरसेवक आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,सर्व पदाधिकारी या सभासद नोंदणी कार्यात सहभागी होणार आहेत. सांगलीमध्ये आमदार सुधीर दादा गाडगीळ आणि मिरजेमध्ये आमदार सुरेश भाऊ खाडे हे स्वतः एकेका बुथवर सभासद नोंदणीसाठी उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक बुथवर किमान २०० सदस्य व्हावेत, असे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. 


संपूर्ण महाराष्ट्रात त्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे सर्व आमदार खासदार मंत्री आपापल्या मतदारसंघात आपापल्या बूथ वर सभासद नोंदणीचे काम करणार आहेत. सांगली विधानसभा आणि मिरज विधानसभा मतदारसंघातील सभासद नोंदणीसाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष श्री प्रकाश ढंग यांनी केले आहे.