yuva MAharashtra सांगलीतील पोलीस अधिकारी व कर्मचारी व कुटुंबियांसाठी सर्वरोग आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !

सांगलीतील पोलीस अधिकारी व कर्मचारी व कुटुंबियांसाठी सर्वरोग आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ जानेवारी २०२५
कर्तव्य बजावत असताना अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना आरोग्याच्या समस्या चालवत असतात. कित्येकदा कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. परिणामी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे व जिल्हा शल्य चिकत्सिक डॉ विक्रमसिंह कदम यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली दादासाहेब चुडाप्पा पोलीस उपाधीक्षक गृह, पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांचे नियोजनामध्ये पोलीस कल्याण विभागामार्फत सांगली जिल्हा पोलीस घटकातील पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार व त्यांचे कुटुंबीय, पोलीस अधीक्षक कार्यालयीन लिपीक वर्ग यांचेकरीता दि. ०८/०१/२०२५ रोजी सकाळी ०९.०० ते २.०० वा पर्यंत कृष्णा मॅरेज हॉल, पोलीस मुख्यालय, सांगली येथे सर्वरोग आरोग्य तपासणी शिबीर आयोजीत करण्यात आले होते सदर आरोग्य शिबीरामध्ये

• ई.सी.जी.

• फास्टींग इन्शुलीन, HBAIC

• नेत्रतपासणी

• बालरोग तपासणी

• फिजिओथेरपी याबाबत उपचार व मार्गदर्शन करणेत आले.

• रक्ताचे नमुने घेवुन त्यामध्ये सी.बी.सी. लीपीड प्रोफाईल, युरीक ॲसिड याबाबत तपासणी करणेत आली.


आयुष तज्ञांमार्फत आयुर्वेदीक व होमिओपॅथिक उपचारांचे मार्गदर्शन करणेत आले.

सदर तपासणी करीता सांगली जिल्हा पोलीस घटकातील पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, पोलीस अधीक्षक कार्यालयीन लिपीक वर्ग व पोलीस कुटुंबीय असे एकुण ३१९ लाभार्थीणी सहभाग घेतला. सदर शिबीरामध्ये वैदयकिय अधिकारी यांनी लाभार्थीची तपासणी करुन उत्तम आरोग्याबाबत मार्गदर्शन केले व ई.सी.जी तपासणी नंतर ४४ लाभार्थीची इको तपासणी मोफत करणेत येणार आहे. त्यामध्ये शस्त्रक्रिया करणे आवश्यक असलेस शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करणेत येणार आहे. तसेच मोतीबिंदुच्या शस्त्रक्रिया मोफत करणेत येणार आहे.


आरोग्य शिबीरामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक सांगली यांचे कार्यालयाकडुन डॉ प्रमोद चौधरी, डॉ. मुजाहीद अलासकर, डॉ. केदार पाटील, डॉ. रोहीत चौगुले यांनी शिबीराचे आयोजन केले. तसेच सेवासदन हॉस्पिटल, कुल्लोळी हॉसिटल, मेहता हॉस्पिटल, सुदर्शन आय हॉस्पिटल यांचे कडील डॉक्टर्स, तंत्रज्ञ व कर्मचारी यांनी सहकार्य केले.