yuva MAharashtra दै. ललकारचे संपादक सुभाष खराडे यांचाभारती विद्यापीठ मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये सत्कार !

दै. ललकारचे संपादक सुभाष खराडे यांचाभारती विद्यापीठ मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये सत्कार !

फोटो सौजन्य  - दै. ललकार

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३१ जानेवारी २०२५

भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगरावजी कदम यांच्या जयंतीनिमित्त आणि भारती विद्यापीठाचे कार्यवाह, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे प्र-कुलगुरू, माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त येथील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मध्ये प्रेरणा भारती उपक्रमा अंतर्गत कृतज्ञता साहाय्याने नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमात दै. ललकारचे संपादक सुभाष खराडे यांचा यावेळी कृतज्ञतापूर्वक सरकार करण्यात आला.

प्रारंभी सर्व प्रमुख पाहुण्याच्या हस्ते डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले. दिपप्रज्वलन केल्यानंतर भारती विद्यापीठ गीत सादर आले. संचालिका डॉ. पल्लवी जामसांडेकर यांनी सर्वांचे स्वागत केले. उपप्राचार्य डॉ. प्रताप देसाई यांनी प्रास्ताविक करुन कार्यक्रम करणेचा उद्देश सांगितला. 


यावेळी प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट व स्पोर्टसमन डॉ. श्रीनिवास नाटेकर, प्रसिद्ध त्वचारोगतज्ञ डॉ. दयानंद नाईक, प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ व सांगलीची पहिली आयर्न स्त्री डॉ. शिल्पा दाते, तरुण भारतचे संपादक मंगेश मंत्री, लोकमतचे सांगली आवृत्ती प्रमुख हणमंत पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी भारतीय टपाल विभागाच्या माय स्टँप याने अंतर्गत प्रकशित केलेल्या डॉ. पतंगरावजी कदम यांच्यावरील टपाल तिकीटाची प्रतिकृतीचे अनावरण प्रमुख पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले.

सर्व प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शेवटी संगणक विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र पुजारी यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमास शिक्षकेतर सेवक शिक्षक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. डॉ. अमरजा नरगुंदे यांनी सूत्रसंचालन केले.