| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ जानेवारी २०२५
गेली १५ वर्षे संजयनगर व परिसरातील बहुजन समाजातील मुलांना शिकवणाऱ्या विनाअनुदानित शाळेतून इलाही बारुदवाले यांनी उत्कृष्ट निकालातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केला आहे. शैक्षणिक गुणवत्ता आणि स्नेहसंमेलन म्हणजे संस्था, शाळा व्यवस्थापन, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या मेहनतीच्या फलिताची कमाई असते. भाग्योदय विद्यामंदिरातून माध्यमातून रचनात्मक कार्य सुरु आहे. मुलांनी खूप शिकावं. आई वडिलांचं नाव करावं. संघर्षाशिवाय यश मिळत नाही. आव्हानांना सामोरे जाण्याचे धैर्य बाळगा. येणारा काळ कृत्रिम बुध्दीमत्तेचा आहे. ते शिकून घ्या. संघर्षाशिवाय यश मिळत नाही. आव्हानांना भिडण्याची ताकद मिळवा. प्रयत्नातील सातत्य यशाकडे नेते. अडचणीवर मात करुन मिळालेले यश खरा आनंद देते. कितीही मोठे व्हा.. शाळेला व आई वडिलांना विसरु नका असे मौलिक उद्गार पृथ्वीराज पाटील यांनी काढले.
भाग्योदय विद्यामंदिराच्या डेक्कन हाॅलमध्ये आयोजित स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष इलाही बारुदवाले होते. स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांचा उत्सव असतो. आहे. यातून मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळून भविष्यातील कलाकार घडतात, असे सांगून पृथ्वीराज पाटील यांनी विविध गुणदर्शनात भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी इलाही बारुदवाले म्हणाले, 'पृथ्वीराजबाबा पाटील हे गोरगरीब बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी मदत करतात. आमच्या शाळेला त्यांची खूप मदत झाली आहे. त्यांनी शाळेला संगणक संच देण्याचे जाहीर केले. यामुळे मुलांना खूप फायदा होईल.
यावेळी विद्यार्थ्यांचा बहारदार विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला. स्वागत व प्रास्ताविकात सईदा बारुदवाले यांनी शाळेच्या कार्याचा आढावा घेतला तर वाघमोडे व लांडगे मॅडम यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले.
यावेळी हनुमान साबळे, सिकंदर बावा, बसवराज चांदकवठे, ज्ञानू डोंबाळे, राजाराम जाधव, इम्रान, समीर व अमीर बारुदवाले, स्कूल कमिटी सदस्य, पालक व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.