yuva MAharashtra काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा !

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ जानेवारी २०२५
सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा हिरक महोत्सवी वाढदिवस पृथ्वीराज पाटील फौंडेशन व शहरी आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी फळे, औषधे, दूध, भोजन व चारा वाटप करुन साजरा केला. वार्ड नं.८ मधील कुपवाड वृध्दाश्रमात प्रशांत देशमुख, भारती भगत, महावीर पाटील, बाळासाहेब मा. माने, कोंडिबा गोयकर, संजय पाटील, मनोज लांडगे, रुपेश मोकाशी, अमोल गडदे, विशाल सरगर, गजानन बिसले यांच्या हस्ते फळवाटप करुन जेष्ठ नागरिकांचा सन्मान व संरक्षणाचा संदेश दिला. 


वार्ड नं. १९ मध्ये स्फूर्ती चौकात 'दारु नको - दूध प्या' या उपक्रमांतर्गत अजय देशमुख, अनिल पवार, राहूल जाधव, प्रकाश रावनंद, संजय शिंदे, राजू पाटील, भालचंद्र कुमारमठ, सुधीर भगत, राजू होर्तीकर, प्रशांत पवार, अमित मुळीक, आरडे साहेब, महेश चव्हाण, महेश पाटील यांनी दूध वाटप करुन व्यसनमुक्तीचा संदेश दिला.


काल कडाक्याच्या थंडीत बस स्टँड, सिव्हिल हाॅस्पिटल, स्टेशन चौक, राजवाडा चौक, महापालिका एरिया इ. सार्वजनिक ठिकाणी थंडीत कुडकुडणाऱ्या अर्धवट झोपेतील लोकांच्या अंगावर मायेच्या नव्या चादरी पांघरण्याचे मानवतावादी काम सनी धोतरे, समीर मुजावर, आशिष चौधरी, शुभम धोतरे, मयूर सरोदे, सूरज धोतरे, राकेश धोतरे व वैभव माने इ. नी केले. 


वार्ड नं.११ मधील तिरंगा कला व क्रीडा मंडळ व पृथ्वीराज पाटील मित्र मंडळाच्या वतीने ए. डी. पाटील, श्रीकांत साठे, साजिद शेख, बबलू अलमेल, राजकुमार कळंत्रे, संजय सावंत, अभिजित चौगुले, विजय कोळी, विशाल तूपसौंदरे इ. नी सावली बेघर निवारा केंद्रात फळे, धामणी रस्त्ता येथील गोशाळा व पटेल चौक परिसरातील कोंडवाड्यातील मुक्या प्राण्यांना विजया पृथ्वीराज पाटील व कार्यकर्ते यांच्या हस्ते चारा वाटप केले आणि संजयनगरात सूर्यनगर, हडको काॅलनी, चिन्मय पार्क ते देवकुळे दवाखाना रस्ता स्वच्छता मोहीम राबविली.यावेळी ऋतुराज पाटील, बिपीन कदम, प्रा. एन.डी.बिरनाळे, हुल्याळकर मामा उपस्थित होते. 


मिरजेत आयुब, आसिफ व युसूफ निशाणदार, यासिन मुकादम, मलिक नायकवडी, अमीर शहापुरे इ. नी रेल्वे स्थानक परिसर व शिकलगार गल्लीत भोजन किट वाटप केले. 

बिसूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात गरजू रुग्णांसाठी औषधे देण्यात आली. यावेळी टी. डी. पाटील सर, उद्योजक अनिल आण्णा पाटील, सोसायटी संचालक विजय पाटील, माजी उपसरपंच रामचंद्र पाटील (नाना), विजय प्रतापराव पाटील, माजी उपसरपंच गजानन पाटील (आबा), संपतबापू पाटील, शिरुभाऊ पाटील, बाळासाहेब पाटील, लक्ष्मण घारगे (तात्या), राजाराम पाटील (बापू), बापूसाहेब पाटील, विवेक पाटील, प्रथमेश पाटील आदी उपस्थित होते.


सांगली विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी ग्रामीण व शहरी भागात ठिकठिकाणी पृथ्वीराज पाटील यांना डिजिटल फलकाद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.