| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. २८ जानेवारी २०२५
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान जनतेला बहाल केले. जनता ही सार्वभौम आहे. जनतेच्या विकासाची हमी संविधानाने दिली आहे आपल्या देशात विविधतेतून एकात्मता जोपासण्याची शक्ती आणि प्रेरणा प्रदान करणाऱ्या संविधान अंमलबजावणीचा दिवस म्हणजे भारतीय प्रजासत्ताक दिवस म्हणजे भारतीय प्रजासत्ताक दिन. गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलात पृथ्वीराज पाटील हे संविधानाचा सन्मान करणारे विद्यार्थी घडवत आहेत. असे उद्गार डॉ. सौरभ पटवर्धन यांनी काढले.
यावेळी, गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील म्हणाले, 'बंधुता, समानता आणि स्वातंत्र्याच्या विचारांनी प्रेरित होऊन उज्ज्वल भारत घडवण्यास कटिबद्ध होऊया. प्रजासत्ताक दिन हा आपल्या लोकशाही मूल्यांचा उत्सव असून, देशाच्या प्रगती आणि एकात्मतेसाठी समर्पित होण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुभाव ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत दिलेली संविधान मूल्ये अंगीकारुन आपला प्रजासत्ताक दिन चिरायू करू या. '
केंब्रिज स्कूलच्या प्रिप्रायमरी विद्यार्थ्यांनी केलेली विविधतेतून एकता दर्शवणारी वेशभूषा आणि एका चिमुकल्याने म. गांधी वेशभूषेत लावलेली उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.
यावेळी डॉ. सौरभ पटवर्धन, विश्वस्त अॅड. विरेंद्र पाटील, समन्वयक प्राचार्य सतीश पाटील, प्राचार्या राजेंद्र मेथे, प्राचार्य साहेबलाल शरीकमसलत, प्राचार्या ख्रिस्तिना मार्टिन, प्रशासकीय अधिकारी रफिक तांबोळी, प्राचार्य कराळे, प्राचार्य गायकवाड, प्राचार्य कुळ्ळोळी मॅडम, प्राचार्य डोंगरे मॅडम, संस्थेच्या सर्व शाखांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते.