yuva MAharashtra समुद्रात फेकलं जाळं, घावलं कोट्यावधीचं घबाड अन् नशीबच पालटलं !

समुद्रात फेकलं जाळं, घावलं कोट्यावधीचं घबाड अन् नशीबच पालटलं !

फोटो सौजन्य  - गुगल फोटो गॅलरी

| सांगली समाचार वृत्त |
टोकियो - दि. ११ जानेवारी २०२५
एखाद्याचे नशीब केव्हा, कोठे आणि कसे पालटेल हे सांगता येत नाही. अचानक एखादे घबाड सापडते, एखादा नातेवाईक कोट्यावधी रुपयांची आपली संपत्ती, ज्याला अपेक्षा नसते त्याच्या नावावर केल्याने तो अब्जाधीश बनतो, कधी घरात अनाहूतपणे तळघरातील संपत्ती सापडते, आणि संबंधित व्यक्ती मालामाल होते. एखाद्याला लॉटरी लागते आणि त्याचे नशीब पालटते. दर्यावर अर्थात समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमार बांधवांना असेच एखादे घबाड सापडते. कधी वजनदार माशाच्या रूपातून, तर कधी व्हेल माशाच्या उलटीतून त्याचे नशीब पालटते.

असेच एका मच्छीमाराचे नशीब पालटले आणि त्याला जणून कोट्यावधी रुपयांची लॉटरीच लागली. अर्थात हा मच्छिमार भारतातील नसून तो जपानमधील आहे. या मच्छीमाराने फेकलेल्या जाळ्यात 276 किलो वजनाचा ट्युना मासा लागला. या माशापासून जपानमध्ये सुशी नावाचा पदार्थ केला जातो. याला मोठी मागणी असल्याने किंमतही तशीच आहे. सहाजिकच वजनदार ट्युना माशालाही तशीच किंमत मिळते. जी दोनशे रुपये किलो असते.

मात्र नुकतेच एका मच्छीमाराने तेथील समुद्रात जाळे टाकले आणि त्याला 276 किलो वजनाचा बाहुबली ट्युना मासा हाती लागला. वास्तविक या माशाला फार फार तर 55 हजार रुपये किंमत मिळाली असती. परंतु या मच्छीमाराने या ट्यूना माशाचा लिलाव करण्याचे ठरवले, ज्याची सुरुवातीची बोली दशलक्ष रुपयापासून सुरुवात झाली आणि पाहता पाहता ती वाढतच गेली. हा मासा हातचा जाऊ नये म्हणून जपान मधील ओनोडेरा ग्रुपने त्यासाठी तब्बल 207 दशलक्ष ( भारतीय रुपयात 11 कोटी) बोली लावली. जी आत्तापर्यंतच्या बोलीमध्ये सर्वाधिक मानली जाते. यापूर्वी टोकियोमध्ये 1999 साली ट्युना मासा याच ग्रुपने 6 कोटी 17 लाख रुपयाला खरेदी केला होता. त्यानंतर प्रथमच ट्युना माशाला इतकी मोठी किंमत मिळाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.