| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३० जानेवारी २०२५
लोकशाहीचे खरे रक्षण करायचे असेल तर भारतीय सहिष्णु झाले पाहिजे. सांप्रदायिक सद्भावना वृध्दीगंत करताना बंधुभाव महत्त्वाचा आहे. सत्याग्रह हे सत्य व न्यायाने हक्क मिळवून देण्याचे साधन आहे. म. गांधींनी या जोरावर देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. गरीबी हटाव व महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी परिश्रम घेतले. म. गांधी यांचे देशावर फार मोठे ऋण आहेत. लोकशाही व स्वातंत्र्य रक्षण हेच गांधीजींना अभिवादन होय असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले. आज हुतात्मा दिनी काँग्रेस भवनात म. गांधी यांच्या प्रतिमेस व स्टेशन चौकात पुतळ्यास पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने म. गांधी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले, कार्याध्यक्ष अनिल मोहिते, पैगंबर शेख, अय्याज नायकवडी, गुलाबराव भोसले यांनी मनोगते व्यक्त केली.
स्वागत व प्रास्तावित मौलाली वंटमोरे यांनी केले व शेवटी आभार विठ्ठलराव काळे यांनी मांनले.
यावेळी माजी पीएसआय सुनील भिसे, प्रमोद आवळे, प्रदीप पाटील, प्रशांत देशमुख, सौ सीमा कुलकर्णी, मीना शिंदे, सुरेश गायकवाड, अपंग सेल प्रथमेश शेटे इंटकचे जिल्हाध्यक्ष डीपी बनसोडे, विक्रम पाटील, मुफित कोळेकर, अनिस बेपारी, शकील गोधड, गणेश वाघमारे, महादेव देवकुळे, सचिन आवळे, अभिजीत मोरकणे व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.