| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३१ जानेवारी २०२५
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आयोजित मा. मदनभाऊ पाटील महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांकाचे १ लाख रुपये व महाकरंडक, कल्याण डोंबिवलीच्या “चिनाब से रावी तक” या एकांकिकेने पटकविला.
सांगली मिरज कुपवाड महापालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वर्गीय श्री. मदनभाऊ पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री. मदनभाऊ पाटील महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दि.27, 28, 29 जानेवारी 2025 रोजी भावे नाटय मंदीर येथे या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये महाराट्रातून एकूण 25 संघानी एकांकिकाचे सादरीकरण केले.
यावेळी महाराष्ट्रातून नांमाकित संघानी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. प्रथम क्रमांकाचे १ लाख रुपये प्रथम पारितोषिक व महाकरंडक कल्याण डोंबिवली यांनी “चिनाब से रावी तक” या एकांकिकाने पटकाला. व्दितीय क्रमांक "सिनेमा" या पुण्याच्या एकांकिकाने पटकाला. तर तृतीय क्रमांकचे पारितोषिक "लेबल सातारा" या एकांकिकाने पटकाला. उत्तेजानार्थ 1 व 2 अनुक्रमे "पाटी भाईदर" व "व्हाय नॉट इस्लापूर" या एकांकिकाने पटकाला.
तसेच बेस्ट दिगदर्शक "चिनाब से रावी तक" या एकांकिकाला मिळाले. बेस्ट अभिनय पुरुष विभाग मध्ये "औदुबर बाबर भाईदर पाटी "याने तर बेस्ट अभिनय स्त्री विभागमध्ये संचिता जोशी चाहूल यांनी पटकविले. इतर ही वैयक्तिक बक्षिके वितरीत करण्यात आले.
या बक्षिक सभारंभावेळी श्रीमती जयश्रीताई पाटील, महापालिकेच्या उपयुक्त विजया यादव, श्री. आकाश डोईफोडे, सुकाणू समितीमधील विजयदादा कडणे, संतोष पाटील, बाळ बरगाले, राजेद्र नातू, अशोक माणकापूरे उपस्थित होते
भावे नाट्यमंदिर सांगली येथे संपन्न झालेल्या या एकांकिका स्पर्धेस सांगली शहरातील नाट्यप्रेमी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता. प्रत्येक एकांकिका ही रसिकांची ठाव घेणारी होती. त्यामुळे परीक्षकांचाही स्पर्धेसाठी निवड करताना कस लागला होता. राज्यभरातून स्पर्धेत सहभागी झालेल्या एकांकिका संयोजकांनी व कलाकारांनी, महापालिकेने केलेल्या अप्रतिम नियोजनाचे मनःपूर्वक कौतुक केले.