| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ८ जानेवारी २०२५
आज माझा देव देव्हा-यात नाही
मन पुन्हा पुन्हा आठवत राही,
कसं करावं, चित्त नाही ठायी
आज माझा देव देव्हा-यात नाही
साहेब आज तुमचा जन्मदिवस,असा एकही दिवस नाही ज्या दिवशी तुमची आठवण नाही...
तुमच्या कार्य कर्तुत्वाकडे बघत बघत... सभा गाजविणारी भाषणं ऐकत आणि जनसामांन्यांच्या ह्लदयाला हात घालणारी भाषणं ऐकतंच लहानाचं मोठं झालो.
मला चांगल आठवतं वाचायला यायला लागल्यावर मी वाचलेली पहिली डिग्री होती एम.ए,एल.एल.बी.,पी.एच.डी.
असे मराठीत लिहिलेली आणि त्यावर रुबाबात मोठ्या अक्षरात नाव “डॉ.पतंगराव कदम'"
खूप शिक्षण झालंय एवढंच त्यावेळी समजायचं पण नक्की काय केलयं साहेबांनी हे बघत बघत आणि अनुभवत मोठं होऊ लागलो.
माझ्या चांगलं लक्षात आहे, लहाणपणी
साधारण १९९९ ते २००४ चा काळ असेल मी माझ्या आजोळी चिंचणी ता.कडेगाव उन्हाळ्याच्या सुट्टीला जायचो तेंव्हा प्रचंड पाण्याचं दुर्भिक्ष होतं-विहीरी ओस. शेती असून पाण्याविना पिकत नव्हती.माणसं पाण्यासाठी वणवण फिरायची.पण जसं साहेबांनी ताकारीचं पाणी पोहचवलं तसं लोकांच जीवनमान
कमालीचं उंचावलं, अर्थिक सुबत्ता आली हे झालं ते फक्त साहेबांमुळेच.
जी परिस्थिती घाटावरची तीच इथली कृष्णाकाठची २००३-०४ साली दुष्काळ होता. कृष्णा नदी ओस पडलेली असताना साहेबांनी भिलवडीत नदीकाठी पूरसंरक्षक भिंती बांधून घेतल्या. आणि धक्कादायक म्हणजे त्यापुढे सलग ३ वर्षे महापूर आला. जर पूरसंरक्षक भिंती बांधल्या नसत्या तर आज भिलवडीचं अपरिमीत नुकसान झालं असतं हे नक्की, ही दूरदृष्टी होती साहेबांची.
हे सर्व अनुभवत असतानाच अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात मी असल्यामुळे साहेबांकडून मी
एक गोष्ट शिकलो होतो परिस्थितीत बदल करायचा असेल तर तो एकाच गोष्टीने होऊ शकतो ती म्हणजे शिक्षण.
तेंव्हाच ठरवलं चांगलं शिकायच,
आणि साहेबांनी उभारलेल्या स्वप्रासाठी कार्यरत रहायचं आणि खारीचा वाटा आपल्या कौशल्याने
उचलायचा. आज भारती विद्यापीठ परिवारात २०१५ पासून कार्यरत असताना दिवसाची सुरवात साहेबांच्या प्रतिमेला हात जोडून
करतो तेंव्हा त्यांचा हात डोक्यावर
असल्याची जाणीव होते हे समाधान स्वर्गातीत आहे.
एक खात्री देतो साहेब तुम्हाला तुमच्या विचारांचा वारसा बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली नक्की त्याच ताकदीने पुढे चालत राहीलं
तुमच्या आठवणीनं हृदय आजही स्तब्ध होत आहे. तुमच्या विषयी लिहील तितकं कमी...
बोलेल तितकं अपुरं..
साहेब, तुम्ही कुठेही गेलेला नाही. आजही आहात प्रत्येकाच्या मनामनात तेच चेतनेच स्फुल्लिंग जागवत. तोच विचारांचा जागर फुलवतं.
साहेब, जयंतीनिमित्त तुमच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. साहेब तुम्ही आमच्यातच आहात, साहेब अखंड प्रेरणेचा स्त्रोत होऊन... साहेब तुम्ही आमच्यातच अखंड प्रेरणेचा महासागर होऊन..!
अमोल वंडे / भिलवडी - ९८९० ५४६ ९०९