yuva MAharashtra मदनभाऊ महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा शानदार उदघाटन सोहळा !

मदनभाऊ महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा शानदार उदघाटन सोहळा !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २८ जानेवारी २०२५

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आयोजित स्वर्गीय मदनभाऊ पाटील स्मृतीप्रित्यर्थ मदनभाऊ महाकरंडक
२०२४-२५ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धाचे उदघाटन कार्यक्रम दि २७/१/२०२५ रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह ,सांगली येथे संपन्न झाला. 

सुरुवातीस मा उप आयुक्त विजया यादव यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले.

मा शुभम गुप्ता आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली 
श्रीमती जयश्रीताई मदनभाऊ पाटील, श्रीमती मंजिरीताई गाडगीळ यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या हस्ते सदर स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

या वेळी मा श्रीमती जयश्री ताई पाटील यांनी सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका यांनी ही स्पर्धा चांगल्या प्रकारे नेटाने नियोजन केले असल्याचे सांगितले. मा मदनभाऊ पाटील यांनी खेळ, कला आणि कलाकारांना नेहमीच साथ देऊन त्यांना प्रोत्साहन दिले आहे, तीच प्रथा सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका यांनी राबविली आहे. त्या मनपा टीम यांचे कौतुक केले.


मा श्रीमती मंजिरीताई गाडगीळ यांनी देखील मनपाच्या या उपक्रमा बाबत समाधान व्यक्त केले. रसिकांना सर्व नाट्य कलाकारांना आणि कलेला प्रतिसाद देऊन गौरविण्यात यावे असे नमूद केले.

मा आयुक्त शुभम गुप्ता म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये नामांकित असलेली स्पर्धा म्हणून सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका घेत असलेली स्पर्धा आहे, याचा मला अभिमान वाटतो. मनपा टीम चांगले काम करत आहे, त्या बाबत समाधान व्यक्त केले आहे, सर्व कलाकार, नियोजन करणारी टीम यांना शुभेच्छा देऊन सदर स्पर्धेचे उद्घाटन झाले असल्याचे घोषित करण्यात आले. प्रारंभी मा उप आयुक्त विजया यादव यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. त्यानंतर, उपस्थित अतिथी यांचा सत्कार करून सदर स्पर्धेचे उद्घाटन झाले असे घोषित करण्यात आले. 

या वेळी माजी सभागृह नेता भारतीताई दिगडे, माजी स्थायी समिती सभापती संतोष पाटील, माजी उप महापौर प्रशांत पाटील, रोहिणी ताई पाटील, डॉ विकास कुरेकर, सामाजिक कार्यकर्ते, सहा आयुक्त आकाश डोईफोडे, डॉ प्रज्ञा त्रिभुवन, सचिन सागावकर, मालमता अधीक्षक धनंजय हर्षद, प्रशासन अधीक्षक अशोक माणकापुरे , ग्रंथपाल शंकर भंडारी, राहुल मुळीक इत्यादी उपस्थित होते.