yuva MAharashtra देशातील पहिला अब्जाधीश, अंबानी-अदानींपेक्षाही मोठा थाट, तरीही कंजूष अफाट !

देशातील पहिला अब्जाधीश, अंबानी-अदानींपेक्षाही मोठा थाट, तरीही कंजूष अफाट !

 फोटो सौजन्य Wikimedia 

| सांगली समाचार वृत्त |
हैद्राबाद - दि. ४ जानेवारी २०२५
भारतातील असोत किंवा परदेशातील अब्जाधीशांची यादी आणि थाट पाहिला की, सर्वसामान्यांची बोटे तोंडात जातात. अशा वेळी त्यांच्या घरातील एखाद्या समारंभाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले की डोळे विस्तारल्याशिवाय राहत नाहीत. आणि मग उगाचच अनेक जण आपली तुलना त्यांच्याशी करीत राहतात. पण भारतीय इतिहासात असा एक आपल्या देश होऊन गेला, जो पेपर वेट म्हणून शंभर कोटी रुपयांचा हिरा वापरत असे यावरून त्याच्या श्रीमंतीची कल्पना येऊ शकते.

असे असूनही त्याला इतिहासात महाकंजुष म्हणून संबोधले जात होतं. त्याच्या सोने आणि हिऱ्याच्या अनेक खाणी होत्या. त्याच्या दारात सोन्याच्या भरलेले ट्रक उभे असायचे. आज एका डॉलरची किंमत 85. 50 रु. आहे. 1940 मध्ये या व्यक्तीची संपत्ती होती 236 अब्ज डॉलर्स... म्हणजे विचार करा तेव्हा त्याच्याकडे किती संपत्ती असेल ? आणि या व्यक्तीचं नाव आहे, मीर उस्मान अली खान. जे हैद्राबादचे शेवटचे निजाम होते.

तेव्हाच्या काळात निजाम मीर उस्मान अली खान हे इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती पैकी एक गणले जायचे. त्यांच्याकडे 50 रोल्स रॉयल गाड्या होत्या. यामध्ये सिल्वर घोस्ट थ्रोन कारही होती. जी तेव्हा जगभरातील अगदी मोजक्या लोकांच्याकडे होती. 1940 च्या सुरुवातीला खान यांच्या संपत्तीचे मूल्य 1700 कोटी रुपये होते. त्यांच्या खजिन्यात प्रिन्सी डायमंड, रिजेंड डायमंड, कोहिनूर, डवटेल्स बॅक डायमंड अशा हिऱ्यांची मालिकाच होती.


असे असूनही हैदराबादचा हे निजाम अत्यंत साध्या राहण्यासाठी प्रसिद्ध होते. ते केवळ कुर्ता पायजमा परिधान करायचे. पायात साधे चप्पल किंवा शूज असायचे. 1930 ते 1940 च्या दरम्यान त्यांची बहुतेक संपत्ती सरकार जमा झाली, जी 100 कोटी रुपये असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, मीर उस्मान अली खान यांनी आपले राज्य पाकिस्तानात विलीन करायचे ठरवले. मात्र 1948 मध्ये भारतीय लष्कराने हैदराबाद निजाम संस्थानावर हल्ला करून त्याची राजवट संपूर्ण व सारी संपत्ती सरकारी खजिन्यात जमा केली. 

आजही हैदराबादच्या राजवाड्यात त्याचे ऐश्वर्य दर्शविणाऱ्या अनेक वस्तू संग्रहित करून ठेवलेल्या आहेत. ज्या पाहिल्या की या निजामाची ऐश आणि संपत्तीचा अंदाज आल्याशिवाय राहत नाही.