| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ जानेवारी २०२५
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ व सांगली शहर जिल्हा तालीम संघ यांच्या मान्यतेने पै. सत्यजित (भैया) पाटील व मंथन नाना मिटकरी युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने विटा येथे दि. १८/०१/२०२५ ते १९/०१/२०२५ महाराष्ट्र केसरी सांगली जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा पार पडली . स्पर्धेसाठी माती व गादी विभागातून १९० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन डब्बल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार दादा पाटील, हिंदकेसरी संतोष वेताळ यांच्या हस्ते पार पडले. अतिशय अतितटीच्या दोन दिवसाच्या स्पर्धेमधून सांगली जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला. माती विभागातून १० व गादी विभागातून १० खेळाडूंची निवड करणेत आली. महाराष्ट्र केसरी गटातून माती विभागातून पै. संदीप मोटे तर गादी विभागातून पै. भारत पवार यांची निवड झाली.
स्पर्धेचा निकालः गादी विभाग- ५७ कि., निनाद बडरे, ६१ कि., पांडुरंग माने, ६५ कि., संकेत गायकवाड, ७० कि., अतुल चौगुले, ७४ कि., अतुल नायकल, ७९ कि., ओंकार लोंढे, ८६ कि., प्रथमेश गुरव, ९२ कि., प्रथमेश पाटील, ९७ कि., मयुरेश मोरे, ओपन महाराष्ट्र केसरी गट भारत पवार.
माती विभाग- ५७ कि., प्रतिक पाटील, ६१ कि., गोविंदराज पोमधरणे, ६५ कि., तेजस पाटील, ७० कि., पृथ्वीराज रसाळ, ७४ कि., गौरव करांडे, ७९ कि., नाथा पवार, ८६ कि., दत्तात्रय खोत, ९२ कि., सचिन माने, ९७ कि., सुनील कोलगोंड, ओपन महाराष्ट्र केसरी गट संदीप मोटे.
स्पर्धेचे बक्षीस समारंभ आमदार सुहास भैया बाबर, डब्बल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, तालीम संघाचे अध्यक्ष राहुलदादा पवार, मा. आमदार पृथ्वीराज देशमुख, राहुल नलावडे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
स्पर्धा पार पाडण्यासाठी तालीम संघाची पै. नामदेव बडरे, पै. सुनील चंदनशिवे, पै. सचिन पाटील, पै.नितीन शिंदे, पै. अरविंद सकट, पै. सदाशिव मलगान, पै. प्रताप एडके, पै. उदय खंबाळे, पै. युवराज पाटील, पै. सुभाष गडदे, पै. तानाजी केसरे, पै. सुनील परमने, पै. अविनाश सूर्यवंशी, पै. सतीश जाधव, पै. दत्ता धोकटे, पै. विनोद गायकवाड, आदी उपस्थित होते. तसेच सर्व पंचानी स्पर्धा पार पाडण्यासाठी उत्कृष्ट काम केले. सर्व विजेत्या मल्लांना पुढील स्पर्धेसाठी तालीम संघातर्फे हार्दिक शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.