| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ जानेवारी २०२५
स्व. श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील यांच्या 24व्या पुण्यतिथी निमित्त लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात आदर्श माता पुरस्काराचे वितरण संपन्न झाले. सौ कांती सदाशिव शेट्टी (जयसिंगपूर), आणि श्रीमती अनिता अनिल खोत (जयसिंगपूर) यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. तृप्ती धोडमिसे यांनी आदर्श माता पुरस्काराने सन्मानित मातांचे कौतुक केले. त्यांच्या हस्ते आदर्श मातांचा शाल, मानपत्र आणि सन्मानित चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री शांतिनाथ कांते यांनी आपल्या भाषणात राजमती अक्का आणि नेमगोंडा काका यांच्या कार्याविषयी महानता आणि मुलींच्या शिक्षणासाठी घेतलेले गोष्ट असेच निरंतर चालू ठेवण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी प्रभारी प्राचार्य श्री व्ही चौगुले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले सहा. प्रा. आर. बी. उद्गाते यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला व उपस्थित मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला. मानपात्राचे वाचन व सूत्रसंचालन सहा. प्रा. अंकिता मगदूम व सहा. प्रा. प्रतिभा आडमुठे यांनी केले. तसेच सहा. प्रा. वीरश्री पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.