| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३१ जानेवारी २०२५
काल गुरुवार दिनांक ३० रोजी महात्मा गांधींच्या पुण्यतिथी दिनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सांगली जिल्हा यांच्यावतीने सांगलीच्या हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये धरणे व निदर्शने करण्यात आली.
महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारकडून महावितरण कंपनी आणि एम एस सी बी चे खाजगीकरणाकडे ओढा वाढलेला आहे. घरगुती औद्योगिक आणि व्यापारी त्याचबरोबर शेतकरी कनेक्शनमध्ये खाजगी प्रीपेड मीटर बसवून स्मार्ट मीटर बसवुन महाराष्ट्रामध्ये सर्व वीज ग्राहक घरगुती असतील. शेतकरी असतील औद्योगिक असतील, किंवा कमर्शियल असतील या सर्वांचा माथे डिजिटल लाईट मीटर मारायचे आणि त्यांना बारा हजार रुपयाला डब-यात घालायचे, पद्धतीने हे लाईट बिलातून वसूल करायचे त्याचबरोबर मोबाईल कार्ड प्रमाणे प्रीपेड योजना आणून सरकारचा सेवाभाव यातून बाजूला करायचा आणि कमर्शियलरित्या वीज व्यवसाय यात जनतेच्या खिशाच्या पैशातून उभा राहिलेले वीज मंडळ असतील, ऑफिसेस असतील, हे खाजगी उद्योगपतींच्या घशात घालायचे उद्योग राज्य व केंद्र सरकारने चालवलेले आहेत.
या गोष्टीला सर्वसामान्य नागरिक, जनता यांचा विरोध आहे. याची जनभावना राज्य शासनाच्या कानापर्यंत जावी याकरिता महात्मा गांधींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकामध्येशिवसेनाच्या वतीने धरणे आंदोलने घेण्यात आले.
वीज ग्राहकांचे हित आणि हजारो तरुणांच्या होणाऱ्या बेरोजगारी बाबत शासनाकडून लादण्यात येणाऱ्या खाजगीकरणाला विरोध यासाठी ते आंदोलन करण्यात आले. सी पी एम चे नेते कॉम्रेड उमेश देशमुख, राष्ट्रवादीच्या नेत्या ज्योती आदाटे, वीज ग्राहक व कर्मचारी संघटनेचे नेते चंद्रकांत नलावडे, विभागीय अध्यक्ष महेश जोतराव यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलन प्रसंगी अदानी गो बॅक, मी डिजिटल बीटा च्या नावाखाली जनतेला महागाईच्या खाईक लोटणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारचा धिक्कार असो, नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी, कोण म्हणते करत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, अशा घोषणांनी आसमंत दणाणून सोडला. या आंदोलनास शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख विष्णू पाटील तालुकाप्रमुख अण्णा विचारे शहर प्रमुख विराज बुटाले, सुरेश साखळकर, महिला आघाडीच्या माजी जिल्हा संघटिका सुजाताई इंगळे मिरज तालुकाप्रमुख आवटी ताई, सतार मेकर, सुतार वहिनी, तसेच उपशहर प्रमुख राम काळे, राजेश कदम, विभाग प्रमुख शितल थोरवे, ग्रामपंचायत सदस्य शुभम उपाध्ये, किशोर सासणे, किरण पवार, अनिल शेटे, अल्ताफ नदाफ, सचिन बामणे, रसूल पेंढारी, मोनल चिवटे, शितल थोरवे, आदी शिवसैनिक उपस्थित होते.