yuva MAharashtra सैफ अली खान बरा झाला, पण विमा पॉलिसी धोरणाचे आरोग्य बिघडले, डॉक्टरांनी केली मोठी भविष्यवाणी !

सैफ अली खान बरा झाला, पण विमा पॉलिसी धोरणाचे आरोग्य बिघडले, डॉक्टरांनी केली मोठी भविष्यवाणी !

फोटो सौजन्य  - गुगल फोटो गॅलरी

| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २१ जानेवारी २०२५

सैफ अली खान एका माथेफिरूच्या चाकू हल्ल्यात जखमी झाला. त्याला एका रिक्षातून लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सेलिब्रेटी असल्याने त्याच्यावर तातडीने उपचार हे सुरू करण्यात आले. तो यामध्ये आता बराही झाला आहे. पण 35.95 लाख रुपयांच्या हॉस्पिटलच्या बिलावरून वाद सुरू झाला असून त्यामुळे विमा पॉलिसी धोरणाचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे आरोग्य सेवा आणि विमा पॉलिसींच्या वाढत्या किमतींवर प्रश्न उपस्थित होत आहेत. मुंबईतील एका सर्जनने विमा कंपन्या 5-स्टार हॉस्पिटल आणि लहान हॉस्पिटलसाठी वेगवेगळ्या पॉलिसी राबवतात हे सांगितले आहे. त्यामुळे रुग्णांच्या उपचारांवर आणि खर्चावर मोठा ताण पडत आहे.

एक पोस्ट शेअर करत हृदयरोगतज्ज्ञ प्रशांत मिश्रा यांनी लिहिले की, अशा प्रकारे विमा कंपन्या छोट्या हॉस्पिटल्सना काढून टाकत आहेत. मला खात्री आहे की, काही वर्षांनी फक्त मोठी कॉर्पोरेट हॉस्पिटल टिकून राहतील. उपचाराचा खर्च खूप जास्त असेल. मेडिक्लेम प्रीमियम देखील जास्त असणार आहे.

बॉलीवूड स्टार सैफ अली खानवर वांद्रे येथील राहत्या घरी चाकूने हल्ला केल्यानंतर त्याला लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याला अनेक जखमा झाल्या होत्या. त्याच्या विमा पॉलिसी कंपनीने कॅशलेस उपचारासाठी 25 लाख रुपये मंजूर केले, परंतु उर्वरित रक्कम अद्याप अंतिम बिलिंगच्या प्रतीक्षेत आहे. या घटनेमुळे उपचारांचा वाढता खर्च आणि त्याचा सर्वसामान्यांवर होणारा परिणाम यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


मुंबईतील हृदयरोगतज्ज्ञ डॉ.प्रशांत मिश्रा यांनी महागड्या रुग्णालयांच्या बिलिंगवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, बहुतेक रुग्णालयांमध्ये पॅकेजची व्यवस्था आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. या चढ्या किमतींचा थेट मध्यमवर्गावर परिणाम होत असल्याचेही डॉ. मिश्रा यांनी सांगितले. डॉ. मिश्रा यांनी पोस्टमध्ये लिहिले होते की, विमा कंपन्या छोट्या रुग्णालयांमध्ये अशाच प्रकारच्या उपचारांसाठी 5 लाखांपेक्षा जास्त रक्कम देण्यास टाळाटाळ करतात. यावरून मोठी रुग्णालये जास्त क्लेम करू शकतात हे दिसून येते. तर सामान्य माणसाला कमी दावे मिळतात. त्यामुळे सर्वसामान्यांवर आर्थिक बोजा वाढतो.

डॉ. मिश्रा यांनी ज्या डॉक्टरची पोस्ट शेअर केली आहे ते एका छोट्या रुग्णालयाचे सहसंचालक आहेत. त्यांनी लिहिले की, विमा कंपन्या 2019 पासून त्यांचे दर वाढवत नाहीत. वारंवार विनंती करूनही कंपन्या दर वाढवत नाहीत. दुसरीकडे, स्वतःच्या मेडिक्लेमचा प्रीमियम दरवर्षी वाढत आहे. वैद्यकीय खर्चात वाढ झाल्याचे कारण कंपन्या देत आहेत.