| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ७ जानेवारी २०२५
सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी विभागाच्या आढावा बैठकीत दिल्या आदेशानुसार आज उपायुक्त वैभव साबळे यांच्या आदेशाने आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र ताटे वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती क्र. 01 सांगली येथे सिंगल युज प्लास्टिक तपासणी, जप्ती व दंडात्मक कारवाई मोहीम घेण्यात आली होती.
सदर मोहीम मध्ये एकूण ३० आस्थापनांची तपासणी केली व ७ आस्थापनांना एकूण ४० ०००/-रु इतकी दंडात्मक कारवाई करण्यात आली. व ७० ते ८० किलो नियमबाह्य प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे.
या मोहीमेमध्ये पर्यावरण अधिकारी अजित गुजराती व MPCB प्रतिनिधी तसेच स्वच्छता निरीक्षक रवी साबळे, धनंजय कांबळे, प्रणिल माने, किशोर कांबळे व गणेश माळी सहभागी झाले होते.
सदर प्लास्टिकमुळे पर्यावरणाची तर हानी होतेच, परंतु हे प्लास्टिक ड्रेनेजमध्ये वा गटारीमध्ये टाकल्याने ड्रेनेज व गटारी तुंबून, पाणी रस्त्यावर वाहू लागते. कधी कधी तर नागरिकांच्या घरात ही पाणी गेल्यामुळे वादाचे प्रसंग निर्माण होतात. परिणामी असे नियमबाह्य प्लॅस्टिक नागरिकांनीही वापरू नयेत, असे पर्यावरण तज्ञांतर्फे करण्यात आले आहे.