yuva MAharashtra आता काश्मीर कश्यप नावाने ओळखले जाणार केंद्रीय गृहमंत्र्यांचे संकेत ?

आता काश्मीर कश्यप नावाने ओळखले जाणार केंद्रीय गृहमंत्र्यांचे संकेत ?


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ३ जानेवारी २०२५
काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग असे संबोधले जाते. येथील निसर्ग सौंदर्यामुळे तेथे पर्यटकांची नेहमीच रेलचेल असते. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी देशाची कमान हाती घेतल्यानंतर, दहशतवादी कारवायाला बसलेला आळा आणि मिळणाऱ्या सोयी सुविधा यामुळे पुन्हा एकदा काश्मीरकडे पर्यटकांचा ओढा वाढला आहे. गेली अनेक शतके किंबहुना अगदी ऐतिहासिक दस्तऐवजातही काश्मीर हाच उल्लेख आढळून येतो. परंतु आता काश्मीरचा उल्लेख कश्यप असा होण्याचे संकेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहेत.

हे का पुस्तक प्रकाशनाच्या समारंभात बोलताना अमित शाह म्हणाले की शंकराचार्यांचा उल्लेख, रेशीम मार्ग, हेशिम मठ यावरून काश्मीरमध्येच भारताच्या संस्कृतीचा पाया घातला गेला होता, हे अनेक ऐतिहासिक पुराव्यावरून सिद्ध होते. आज पर्यंतच्या कार्यकाळात सर्वच धर्म मार्तंडाने काश्मीरचा उत्तम पद्धतीने विकास केला आहे, असे शाह यांनी सांगितले.


यावेळी बोलताना ते म्हणाले की कलम 370 आणि 35ए हे काश्मीरला, देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोठा अडथळा होता. स्वातंत्र्यानंतर या कलंकीत अध्यायाला हटवण्याचे आणि येथे विकासाचे मार्ग उघडण्याचे काम मोदी सरकारने केले. कलम 370 मुळेच तरुणांमध्ये फुटेलचा वादाची बीजे रोविली गेली. भारत आणि काश्मीरच्या एकोप्याला आळा बसला. त्यामुळेच काश्मीर खोऱ्यात दहशतवाद वाढला. कलम 370 मुळे या सर्व गैरप्रकाराला आळा बसला असून, भारताचा हा शिरपेच आता अधिक डौलाने मिरवू लागेल, असे अमित शाह यानी सांगितले.