| सांगली समाचार वृत्त |
कोल्हापूर - दि. ७ जानेवारी २०२५
बदलत्या काळानुसार तंत्रज्ञान हे बदलतं. याचा फायदा निश्चितच समाजाला होत असतो. या बदलत्या तंत्रज्ञानाच्या मदतीने समाजाची प्रगती होत असते. ती तर क्षेत्राप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रही या आधुनिक बदलत्या तंत्रज्ञानापासून दूर नाही. गेल्या काही वर्षात वैद्यकीय क्षेत्राने कात टाकली आहे. अनेक किचकट शस्त्रक्रिया या बदलत्या तंत्रज्ञानाने शक्य झाल्या. अनेक जीवघेण्या आजारापासून रुग्णांना बरे करण्यात डॉक्टरांनी या बदलत्या तंत्रज्ञानाचा आधार भेटला. सहाजिकच मातेच्या प्रसुतीची याच प्रगत तंत्रज्ञानाने सोयीची झाली आहे.
प्रत्येक 20 ते 25 वर्षांनंतर जन्माला येणार्या पिढीसाठी त्या-त्या काळाचे प्रतीक म्हणून विशिष्ट नाव दिले जाते. यापूर्वीची पिढी अल्फा नावाने ओळखली गेली. आता नव्या पीढीला बीटा, अल्फा जनरेशनची माहिती आहे; मात्र अगदी 1901 पासून प्रत्येक 20 ते 25 वर्षाच्या टप्प्यावर त्या-त्या पिढीला एक नाव दिले गेले आहे. त्याबरोबरच त्या काळाची वैशिष्ट्येही त्यापुढे नमूद केली जातात. काळ बदलतो, तंत्रज्ञान बदलते त्याबरोबर पिढीचे नावही बदलते.
देशातील बीटा जनरेशनचे पहिले बाळ मिझोरममध्ये भारतात पहिल्या बीटा जनरेशन बाळाचा जन्म मिझोरमच्या आयझॉल येथील सिनॉड हॉस्पिटलमध्ये 1 जानेवारीला 12 वाजून 3 मिनिटांनी झाला. कोल्हापूर मधील सर्वसामान्यांचे रुग्णालय असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात नववर्षाची पहाट होत असतानाच करवीर तालुक्यातील गोकुळ शिरगावच्या सौ. ज्योती शिंदे या सीपीआर हॉस्पिटलमध्ये 31 डिसेंबरला रात्री दहाच्या सुमारास दाखल झाल्या. त्यांच्यावर प्रसूतिगृह विभागात उपचार करण्यात आले. मध्यरात्री त्यांनी मुलाला जन्म दिला आणि कोल्हापूरच्या सामान्य रुग्णालयातला बीटा जनरेशनची सुरुवात झाली.
काय आहे बीटा जनरेशन ?
या नववर्षाची सुरुवात नव्या बीटा जनरेशनने झाली. बीटा जनरेशन म्हणजे 2025 ते 2039 या 14 वर्षांच्या काळात जन्माला येणारी पिढी. ही पीढी 'जेन बेटा' म्हणून ओळखली जाणार आहे. इथून पुढे येणारा काळ आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा असणार आहे. यामुळे या बीटा जनरेशनमधील मुलांकडून नव्या तंत्रज्ञानाचा, नव्या उपकरणांचा सर्वाधिक वापर होणार आहे.
साल आणि नवी पिढी, नवे नाव
1901-1927 : द ग्रेटेस्ट जनरेशन
1928-1945 : द सायलेंट जनरेशन
1946-1964 : बेबी बूम जनरेशन
1965-1980 : जनरेशन एक्स
1981 - 1996 : मिलेनिअल्स
1997 - 2010 : जनरेशन झेड
2010 - 2024 : जनरेशन अल्फा
2025-2039 : जनरेशन बीटा