| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३१ जानेवारी २०२५
भारतामध्ये तरुणांची सर्वात मोठी जबाबदारी म्हणजे शिक्षण पूर्ण करून कुटुंबाची देखभाल करणे. त्यामुळे बऱ्याच तरुणांना दहावीनंतर उच्च शिक्षण घेणे शक्य होत नाही किंवा ते शिक्षण अर्धवट सोडून नोकरी शोधतात. परंतु, दहावीच्या नंतरही काही फायदेशीर कंप्यूटर कोर्स आहेत, जे पूर्ण केल्यानंतर तुम्ही चार ते पाच लाख रुपयांपर्यंत पॅकेज असलेल्या नोकऱ्या मिळवू शकता. खालील पाच कोर्सेस तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. याचा प्रारंभिक खर्च अधिक वाटत असला तरी दीर्घकालीन कमाईचा विचार करता ही गुंतवणूक तशी कमी म्हणावी लागेल.
दहावीनंतर करू शकता ‘हे’ कंप्यूटर कोर्सेस:
१) आयटीआय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
या दोन वर्षांच्या कोर्सची फी सुमारे ७०,००० ते १,००,००० रुपये आहे. पूर्ण केल्यानंतर तुम्हाला वर्षाला ३ ते ४ लाख रुपयांचे पॅकेज असलेली नोकरी मिळू शकते.
२) आयटीआय कंप्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट
एक वर्षांचा हा कोर्स २०,००० ते १,००,००० रुपये फी असतो. याची पूर्णत्वानंतर २ ते ३ लाख रुपयांपर्यंत पॅकेज असलेल्या नोकऱ्या मिळवू शकता.
३) डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी
हा डिप्लोमा एक ते तीन वर्षांचा असून, ५०,००० ते ९०,००० रुपये फी लागते. या डिप्लोमाच्या आधारावर तुम्ही चार ते पाच लाख रुपयांचे पॅकेज मिळवू शकता.
४) कोर्सेस ऑन कंप्युटर कॉन्सेप्ट्स (CCC)
या शॉर्ट टर्म दोन महिन्यांच्या कोर्ससाठी ५०,००० ते ६०,००० रुपये फी लागते. या कोर्सच्या पूर्ण झाल्यानंतर ३ ते ४ लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरी मिळू शकते.
५) बेसिक कंप्युटर कोर्स (BCC)
हा एक एंट्री लेव्हल कोर्स आहे ज्यामध्ये तुमचं कंप्युटरच्या मूलभूत ज्ञानावर आधारित प्रशिक्षण मिळेल. या कोर्सची कालावधी एक ते सहा महिने असते आणि फी १२,००० ते २४,००० रुपये असते. या कोर्सच्या पूर्णत्वानंतर तुम्हाला १ ते ३ लाख रुपयांच्या पॅकेजच्या नोकऱ्या मिळू शकतात.
अशा प्रकारे दहावीनंतर तुमचं करिअर घडविण्याची उत्तम संधी तुम्हाला मिळू शकते!