| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. ४ जानेवारी २०२५
छगन भुजबळ यांनी साधारण तीन वर्षांपूर्वी अजित पवार यांच्याबरोबर महायुतीत प्रवेश केल्यानंतर राजकारणातील चाणक्य शरद पवार यांच्या पासून ते दूरच होते. मध्यंतरी सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेण्यासाठी गेले असता त्यांना दीड दोन तास तिष्ठत बसावे लागले होते. अलीकडील काळात त्यांचे बोलणे हे झाले नाही. या पार्श्वभूमीवर काल सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने पुण्यातील एका कार्यक्रमात दोघेही एकाच मंचावर आले. परंतु शेजारी असूनही दोघांनी एकमेकांशी बोलणे टाळले होते. मात्र थोड्या वेळानंतर शरद पवार यांनी आपल्या हातातील पत्रिकेवर दोन ओळींचा एक संदेश लिहिला आणि तो छगन भुजबळ यांच्या हाती दिला. भुजबळ याने तो गुपचूप वाचताही. यानंतर दोघांमध्ये छोटासा संवाद झाला व दोघेही हसू लागले.
सध्या मंत्रिमंडळात सहभागी करून न घेतल्याने छगन भुजबळ हे नाराज आहेत. आपली नाराजी त्यांनी जाहीरच्या बोलूनही दाखवली आहे. मध्यंतरी भुजबळ याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. सध्या ते अजित पवार यांच्यापासून दूर आहेत. मंत्रीमंडळ विस्तारानंतर दोघांची भेट ही झाली नाही. त्यामुळे ते अजित पवार यांची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर भुजबळ आणि शरद पवार यांचा हा प्रसंग राजकारण्यांसाठी चर्चेचा विषय बनला आहे.
छगन भुजबळ हे भाजपसोबत जाणार की पुन्हा स्वगृही परतणार याबाबत आता चर्चा रंगू लागले आहेत. अशातच खा. सुप्रीयाताई सुळे यांनीही भुळबळ यांच्या पक्षप्रवेशाबाबत संकेत दिले आहेत. मध्यंतरी भाजप त्यामुळे राज्यसभेवर पाठवणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तर अजित पवार यांनी भुजबळ यांना देश पातळीवरील नेतृत्व देणार असल्याचे स्वतः केले होते. आगामी एक-दोन दिवसात भुजबळ हे आपली भूमिका स्पष्ट करतील. तोपर्यंत भुजबळ भाजप सोबत जाणार की शरद पवार यांच्याबरोबर किंवा मग स्वतंत्र मार्ग स्वीकारणार ? याची चर्चा होत राहणार आहे.