| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ४ जानेवारी २०२५
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. परिणामी लाडक्या बहिणींनी महायुतीतील उमेदवार भावांच्या पाठीशी उभे रहात, त्यांच्या मतदान यंत्राद्वारे भरभरून मतांचे दान दिले. यावरून महाआघाडीने या विरोधात आरोपांची राळ उडवली, जी त्यांच्याच अंगलट आली.
मात्र अनेक त्रुटींप्रमाणे दाखल झालेल्या बहिणींच्या अर्जाची काटेकोर पडताळणी न होऊ शकल्याने लाभार्थी भगिनींमध्ये, अनेक सधन बहिणींनीही हात धुवून घेतले. ज्यांच्या बँक खात्यात आज पर्यंत तब्बल नऊ हजार रुपये जमा झाले आहेत. परंतु आता फडणवीस सरकारची सत्तारूढ झाल्यानंतर या बहिणींवर वक्रदृष्टी पडली असून, लाडक्या बहीण योजनेसाठी दाखल झालेल्या अर्जाची पडताळणी सुरू केली आहे.
लाडक्या बहिणी योजनेसाठी अर्ज करताना विशिष्ट निकष पाळणे महिलांकडून अपेक्षित होते. मात्र सर्वच सरकारी योजनेचा गैर लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांप्रमाणे या योजनेवरही महिलांच्या कुड्या पडल्या. संपूर्ण राज्यभरातून लाखो महिलांनी यासाठी अर्ज दाखल केले. त्यांच्या खात्यात लाडक्या बहिणी योजनेचे पंधराशे रुपये अनुदान जमाही झाले. वास्तविक सधन महिलांनीही अनुदान लागण्याची ही बाब सरकारच्या लक्षात आली होती. मात्र तेव्हाच पडताळणी केली गेली असती, तर त्याचा निवडणुकीवर विपरीत परिणाम झाला असता. म्हणून शिंदे सरकारने त्याकडे कानाडोळा केला.
परंतु आता राज्यभरातील लाडक्या बहिणी योजनेची पुन्हा पडताळणी होणार असून, लेख असे डावलून घेतलेल्या बहिणींचे अनुदान पुन्हा सरकार जमा होणार आहे. याची सुरुवात धुळे जिल्ह्यातील नकाणे गावातून झाली असून निखिल एका महिलेने, या योजनेचा गैरफायदा घेतल्याचे निष्पन्न झाल्याने तिच्या खात्यावरील साडेसात हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता या योजनेचा लाभ घेतलेल्या बहिणींमध्ये खळबळ माजली आहे. आपल्या खात्यावरील पैसे पुन्हा सरकार जमा होणार का ? असा प्रश्न लाभार्थी बहिणींना पडला आहे.