yuva MAharashtra अजित पवार यांचे धनंजय मुंडें यांच्याबाबत महत्वपूर्ण विधान... स्पष्ट सांगितलं !

अजित पवार यांचे धनंजय मुंडें यांच्याबाबत महत्वपूर्ण विधान... स्पष्ट सांगितलं !


फोटो सौजन्य  - गुगल स्रोत 

| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ७ जानेवारी २०२५
जोपर्यंत अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुरावा सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. न्यायालयीन चौकशी, एसआयटी व सीआयडी चौकशी होईपर्यंत कारवाई केली जाणार नाही. तिन्ही चौकशीमध्ये जो दोषी असेल, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडे यांच्या राजीनाम्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. 

राजीनाम्याच्या विषयावर कसलीच चर्चा झालेली नाही. कुणी काय आरोप करावेत, हे लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे. माझे म्हणणं आहे की ट्रायल कोर्टात होऊ द्या. तपास यंत्रणा काम करत आहे. फेक नॅरेटिव्ह तयार केला जात आहे, असा आरोप अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी केला. ते पत्रकारांशी बोलत होते. मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सुमारे तासभर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी राजीनाम्याबाबत स्पष्टीकरण दिले.

राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षाने रान उठविले

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षाने चांगले रान उठविले आहे. विरोधी पक्षाने राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेऊन मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर माजी खासदार संभाजीराजे यांनी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. दरम्यान, मुंडे यांनी आज उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, मुंडे यांनी राजीनाम्याच्या विषयावर चर्चाच झाली नसल्याचे सांगितले.