yuva MAharashtra हरवलेले मोबाईल मूळ मालकास परत केले सांगली ग्रामीण पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी !

हरवलेले मोबाईल मूळ मालकास परत केले सांगली ग्रामीण पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ जानेवारी २०२५

एखादा किमती मोबाईल हरवला किंवा चोरीस गेला तर तो सापडण्याची अपेक्षा संबंधित मोबाईलधारकास जवळजवळ नसतेच. त्यामुळे संबंधीत व्यक्ती ही अपेक्षा सोडून नवा मोबाईल खरेदी करते. परंतु नव्या तांत्रिक सुविधेमुळे आणि सांगली पोलिस सायबर विभागाची स्थापना झाल्यामुळे, असे हरवलेले किंवा चोरीस गेलेले मोबाईल सापडण्याची शक्यता वाढली आहे. गत दीपावलीच्या वेळी सांगली शहरातील काही मोबाईल धारकांना त्यांचे हरवलेले मोबाईल परत करून सांगली पोलिसांनी एक प्रकारची दिवाळी भेट दिली होती.

आताही अविनाश सोपानदेव कुंभार (रा. कर्नाळ) व प्रवीण धनपाल चौगुले (रा. कसबे डिग्रज) यांचे अनुक्रमे विवो व मोटोरोला कंपनीचे किमती मोबाईल गहाळ झाले होते. या दोघांनीही सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. तेव्हा उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती विमला एमह व सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली ग्रामीणचे पोलीस कॉन्स्टेबल रोहित साखरे व सायबर विभागाकडील पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटणकर यांनी विशेष तपास करून हे मोबाईल शोधून दिले. हरवलेले किंमती मोबाईल परत मिळाल्यामुळे अविनाश कुंभार व प्रवीण चौगुले यांनी सांगली ग्रामीण पोलिसांचे वय साहेबावर विभागाचे आभार मानले आहेत.