| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ६ जानेवारी २०२५
सांगली हे महापालिका क्षेत्रात पर्यटनाच्या दृष्टीने हरिपूर चा संगम, ऐतिहासिक गाव भागातील सांभारे गणपती मंदिर, गणेश दुर्ग, आयर्विन पूल, काळीखण यासारख्या पुरातन व नैसर्गिक वास्तू आमराई, प्रतापसिह उद्यान, छत्रपती संभाजी महाराज स्मारक व सांगलीच्या मातीतील ईतीहासाचा पाउल खुणा दर्शवनारी शंभुश्रुष्ठी, यांचा पर्यटनाच्या दृष्टीने विचार करणे गरजेचे आहे. हरिपूर संगम हे विहंगम निसर्ग पर्यटन
स्थळ, पौराणिक सांभारे गणपती मंदिर, अनेक कलाकुसरीने नटलेले सांगलीचे आराध्य दैवत गणपती
मंदिर, वास्तुविशारदाचा उत्कृष्ट नमुना असलेले व शंभर वर्ष पूर्ण केलेला सांगलीचा आयर्विन पूल, नदीमध्ये थरारक स्कायवॉक, प्रतापसिंह उद्यानच्या जागेमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी च्या धरतीवर भव्य असे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक त्याचबरोबर इतिहासाचे सांगलीतील पाऊल खुणा दाखवणारे शंभूसृष्टी, प्रतापसिंह उद्यान व आमराई सुशोभीकरण विविध खेळणी, प्राणी व पक्षी संग्रहालय, काळाखणीमध्ये कागलच्या धरतीवर म्युझिक कारंजा, गणेश दुर्ग व मिरजेचा दर्गा व वास्तु संग्रहालय, काळ्याखणी • लगत लंडन आय सारखा पाळणा सांगलीचे सांस्कृतिक ऐतिहासिक गोष्टींना उजाळा देणारी स्थळे अशा अनेक गोष्टी पर्यटनाच्या दृष्टीने आपण विकसित करण्याबाबत विचार केला पाहिजे. या सर्व स्थळांना जोडणारी व अत्यंत अल्प खर्चात तयार होऊ शकेल अशी । ट्राम सेवा करता येईल. तसेच पोलिस मुख्यालयासमोर ७५ पुट उंचीचा शौर्य ध्वजस्तंभ उभा करता येईल. अशा अनेक बाबींचा • नागरिकांकडून अपेक्षा आहेत.
याबाबत सकारात्मक विचार व्हावा
सांगली येथील प्रतापसिंह उद्यान चे काम देखील गेली तीन वर्षापासून रखडलेले आहे. प्रताप उद्यान हे सांगलीकरांच्याजिव्हाळ्याचा प्रश्न आहे. लहान मुलांपासून महिला, वृद्ध, विद्यार्थी व नागरिक हे आवर्जून आठवड्यातून एकदा का होईना बागेत येत असत. हल्लीच्या मुलांना सांगलीत या ठिकाणी प्रताक्षे उद्यान होते. तेथे सिंह, अस्वल, कोल्हे तर साळींदर, अनेक सर्व पक्षी व इतर प्राणी संग्रहालय होते एवढे सांगायची सोय राहिली आहे. विरंगुळा व बाहेरील स्टॉल वरील खाद्य तसेच लहान मुलांना थोडावेळ खेळण्यासाठी मध्यवर्ती शहरातील असे हे एकमेव ठिकाण होते. पण आज उद्यान भकास झाले आहे. नागरिकांची रेलचेल नसल्याने बाहेरील खाद्य विक्रेत्यांचा व्यवसाय मोडकळीस आला आहे पर्यटन विकास बाबत बजेट सन २०२५-२६ मध्ये भरीव तरतूद करावी. असे निवेदन मा. मुख्यमंत्रीसो व मा आयुक्त यांच्याकडे दिले आहे.