सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १७ जानेवारी २०२५
श्री आयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सांगलीतील नेमिनाथ नगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य अशा अयोध्या नगरीत आज दि. 17 ते 27 जानेवारी दरम्यान श्रीराम कथा व नाम संकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, या सोहळ्यासाठी दि. 22 जानेवारी रोजी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व ना. अजितदादा पवार यांच्यासह खा. विशालदादा पाटील, माजी अर्थमंत्री तथा विद्यमान आमदार जयंतरावजी पाटील, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार विश्वजीत कदम, माजी कामगार मंत्री तथा विद्यमान आमदार सुरेशभाऊ खाडे, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुभाषबापू देशमुख, कार्यसम्राट आ. सुधीरदादा गाडगीळ, आ. सत्यजित देशमुख, आ. विनय कोरे, आ. गोपीचंद पडळकर, आ. सुहास बाबर, आ. रोहित आर पाटील, आ. राहुल आवाडे, आ. सदाभाऊ खोत, आ. अशोक माने, आ. अरुणअण्णा लाड, माजी खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार नितीन शिंदे यांच्यासह वरिष्ठ शासकीय अधिकारी व सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री. समीतदादा कदम उपस्थित राहणार असल्याची माहिती अध्यक्ष मनोहरकाका सारडा यांनी पत्रकार बैठकीत दिली.
या सोहळ्यात केज (बीड) येथील ह. भ. प. पूज्य श्री. समाधान महाराज हे शनिवार दि. 18 जानेवारी ते रविवार 26 जानेवारी 2025 अखेर मराठीतून राम कथा सांगणार आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांचा कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या भव्य दिव्य मंगलमय कार्यक्रमासाठी तसाच भव्य दिव्य मंडप उभारण्यात आला असून यामध्ये एकाच वेळी पंधरा ते वीस हजार भाविक या सुश्राव्य कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतील.
यानिमित्त दिनांक 17 रोजी सकाळी साडेआठ वाजता शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे (गुरुजी) यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण होणार असून, यावेळी 11 वैदिक ब्राह्मणांचा मंत्रोच्चार संपन्न होईल. यावेळी प. पू. बजरंग झेंडे महाराज, प. पू. गुरुनाथ कोटणीस महाराज, प. पू. दीपक नाना केळकर महाराज, प. पू शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी, गायत्री परिवाराचे अध्यक्ष श्री नरेंद्र भाई जानी, यांचे पवित्र सानिध्य लाभणार आहे. तसेच चितळे उद्योग समूहाचे श्री. श्रीपाद चितळे, उमेद ग्रुपचे श्री सतीश व नितीन मालू, उद्योजक श्री. विनोद घोडावत, उद्योजक श्री. नितीन झंवर, आष्टा पीपल बँकेचे चेअरमन श्री. दिलीप वग्याणी, एस के ऍग्रो चे श्री. अरविंद कुलकर्णी, तसेच गायत्री परिवार मुंबईचे श्री कीर्तीबाई कोठारी हे उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवार दि. 17 ते सोमवार दि. 27 जानेवारी 2025 अखेर संकीर्तनाचा सोहळा रंगणार आहे.. यामध्ये ह. भ. प. श्रीगुरु कान्होबा महाराज देहूकर, (श्री क्षेत्र देहू), ह. भ. प. योगीराज महाराज गोसावी (श्री शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचे विद्यमान वंशज) (श्री क्षेत्र पैठण), वारकरी रत्न ह. भ. प. श्रीगुरु गोविंद महाराज जाटदेवळेकर (पाथर्डी), वारकरी भूषण ह. भ. प. श्री उमेश महाराज दशरथे (श्रीक्षेत्र आळंदी), अभंग मर्मज्ञ ह. भ. प. श्री महादेव महाराज राऊत (बीड), संत साहित्याचे गाढे अभ्यासक ह. भ. प. श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर, श्री संत माणकोजी बोधले महाराजांचे विद्यमान वंशज ह. भ. प. श्री गुरु जयवंत महाराज बोधले ( श्री क्षेत्र पंढरपूर), ॲड. ह. भ. प. श्री गुरु कृष्णा महाराज चवरे (श्री क्षेत्र पंढरपूर), श्री संत तुकाराम महाराजांचे विद्यमान वंशज ॲड. ह. भ. प. श्री गुरु ऋषिकेश महाराज वासकर (श्री क्षेत्र पंढरपूर), ह. भ. प. श्री. गुरु भागवत महाराज चवरे (श्री क्षेत्र पंढरपूर), ह. भ. प. श्री. रघुनंदन महाराज पुजारी (धाराशिव) यांच्या सुश्राव्य संकिर्तनाचा लाभ भाविकांना होणार आहे.
या सर्व मंगलमय कार्यक्रमासाठी सांगली महापालिका क्षेत्रासह, परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री. मनोहरकाका सारडा यांच्यासह सर्व आयोजकांनी केले आहे.