युद्धनौका, विनाशिका आणि पाणबुडी एकाच वेळी राष्ट्राला समर्पित !
| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १६ जानेवारी २०२५
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयएनएस निलगिरी फ्रिगेट, आयएनएस सुरत विनाशिका आणि आयएनएस वाघशीर या पाणबुडीचे राष्ट्रार्पण झाले. या प्रसंगी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नौदलाचे अधिकारी उपस्थित होते. एकाचवेळी तीन नौकांचे राष्ट्रार्पण करण्याच्या ऐतिहासिक सोहळ्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलला २१ व्या शतकासाठी सशक्त करण्याच्या दृष्टीने एक दमदार पाऊल टाकण्यात आल्याचे सांगितले. देशाने ज्या नौकांचे राष्ट्रार्पण केले त्या स्वदेशी नौका आहेत. या निमित्ताने आत्मनिर्भरतेकडे आणखी एक पाऊल टाकल्याचेही पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रार्पणाच्या या ऐतिहासिक क्षणासाठी पंतप्रधान मोदींनी नौका तयार करणारे श्रमिक, माझगाव गोदी, भारतीय नौदल, संरक्षण मंत्रालय या सर्वांचेच जाहीर आभार मानले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय नौदलाला नवा दृष्टीकोन दिला. आज त्यांच्या महाराष्ट्रात नौदलाला २१ व्या शतकासाठी सशक्त करण्याच्या दृष्टीने दमदार वाटचाल सुरू असल्याचे पंतप्रधान म्हणाले, सागरी यात्रा, व्यापार, सागरी संरक्षण, जहाज बांधणी, जल मार्गाने होणारी मालवाहतूक या सर्व क्षेत्रात भारताला समृद्ध इतिहास आहे. या इतिहासातून प्रेरणा घेत भारत अधिकाधिक सशक्त होत आहे. चोल वंशाच्या पराक्रमाला मानवंदना देणारी आयएनएस निलगिरी फ्रिगेट, गुजरातच्या व्यापाऱ्यांनी भारताला पश्चिम आशियाशी जोडले या घटनेची आठवण करुन देणारी आयएनएस सुरत विनाशिका आणि आयएनएस बाघशीर ही पाणबुडी या तीन सामर्थधशाली नौकांचे राष्ट्रार्पण करण्याचे भाग्य लाभल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी आनंद व्यक्त केला.
भारताकडे जग एक विश्वासू आणि जबाबदार साथीदार म्हणून बघत आहे. समुद्रात अडचणीत सापडलेल्यांना भारतीय जहाज मदतीला आल्याचे दिसले की धीर येतो. भारताचा भर विस्तारवादावर नाही तर विकासवादावर आहे. भारतानं नेहमी खुल्या, सुरक्षित, सर्वसमावेशक, वैभवशाली इंडो पॅसिफिकचे समर्थन केले. समुद्र किनारा असलेल्या देशांच्या विकासासाठी भारत सागर अर्थात सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन हा मंत्र दिला, भारत हाच दृष्टीकोन घेऊन वाटचाल करत आहे. जी २० परिषदेत भारताने जगाला 'वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर' हे सांगितले. भारत सर्वांची सोबत, सर्वाचा विकास आणि सर्वाचा विश्वास या विचाराने काम करणारा देश आहे आणि यापुढेही याच पद्धतने काम करेल; असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
भारतात निर्मित सूरत आणि निलगिरी (युद्धनौका) तसेच वाघशीर (पाणबुडी) या तीन महत्वाच्या नौका मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे झालेल्या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्राला समर्पित करण्यात आल्या. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नौसेना प्रमुख दिनेशकुमार त्रिपाठी यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, संपूर्ण विश्च हा परिवार मानून भारत विकासाच्या भावनेने काम करतोय, तीन आघाडीच्या लढाऊ जहाजांचा नौदलामध्ये समावेश एक मजबूत आणि स्वावलंबी संरक्षण दल निर्माण करण्यासाठी भारताची अटल बचनबद्धता अधोरेखित करते. भारतीय समुद्र क्षेत्रात भारत प्रथम प्रतिसादकर्ता म्हणून उदयास आला आहे. नौदलाने अनेकांचे जीव वाचवले आहेत आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मालवाहतूक सुरक्षित केली आहे. यामुळे जगभरातून भारतावर विश्वास वाढला असून आज जागतिक स्तरावर, विशेषतः 'ग्लोबल साउथ 'मध्ये भारत एक विश्वासार्ह आणि जबाबदार भागीदार म्हणून ओळखला जातो. तीन युद्धनौकांचे राष्ट्रार्पण सैन्याबरोबरच आर्थिक दृष्टीने सुद्धा महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
जमीन, पाणी, हवा, खोल समुद्र किंवा अनंत अवकाश अशा सर्वच क्षेत्रात भारताने आपले हित जपून तिनही सेनादलांच्या माध्यमातून मागील काही वर्षात आत्मनिर्भर बनण्याची प्रशंसनीय वाटचाल मुरू ठेवली आहे. एकाचवेळी विनाशिका, युद्धनौका आणि पाणबुडी कार्यान्वित होत असल्याने छत्रपती शिवाजी म हाराजांच्या पवित्र भूमीवर भारतीय नौदलाने स्वाबलंबी होण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले असल्याचे प्रधानमंत्री श्री, मोदी यांनी यावेळी नमूद केले. भारतीय सैनिकांना आता भारतीय युद्ध सामग्री उपलब्ध होत असून १०० हून अधिक देशांना संरक्षण सामग्री निर्यात केली जात आहे. या माध्यमातून 'मेक इन इंडिया' योजनेचा विस्तार होत असून आर्थिक प्रगतीचे दार उघडून भारताच्या तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करण्याच्या प्रक्रियेत मोठा हातभार लागत असल्याचे गौरवोद्वार प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी काढले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले की, एकाच वेळी तीन युद्धनौका राष्ट्राला अर्पण होत असल्याने भारतीय समुद्री क्षेत्रात देशाची ताकद आणि महत्व बाढले आहे. या क्षेत्रातून मोठे व्यापार होत असून संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होत आहे. आधुनिकीकरणावर भर देण्यात येत असून या तिनही नौका त्यादृष्टीने सक्षम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
नौदल प्रमुख डमिरल श्री. त्रिपाठी यांनी नौदलासाठी गौरव आणि प्रतिष्ठेचा दिवस असल्याचे सांगून या निमित्ताने शक्ती, क्षमता आणि आत्मनिर्भरता साजरी केली जात असल्याचा उल्लेख केला.
आयएनएस सूरत प्रकल्पातील चौघे आणि अंतिम जहाज आहे असून जगातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक विनाशिकांपैकी एक आहे. या जहाजामध्ये ७५ टक्के स्वदेशी घटक असून यात अत्याधुनिक शत्र-संवेदक प्रणाली आणि प्रगत नेटवर्क केंद्रित क्षमता आहेत.
आयएनएस बापशीर स्कॉर्पीन प्रकल्पातील ही सहावी आणि अंतिम पाणबुडी आहे. ही भारताच्या पाणबुडी बांधणीतील वाढत्या कौशल्याचे प्रतिनिधित्व करते. फ्रान्सच्या नेव्हल ग्रुपच्या सहकार्याने ही तयार करण्यात आली आहे.
आयएनएस निलगिरी स्टेल्थ युद्धनौका प्रकल्पातील ही पहिली नौका आहे. भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाईन ब्युरोने याचे डिझाइन केले आहे. यात टिकाऊपणा, समुद्रात स्थिरता आणि स्टेल्थसाठी प्रगत वैशिष्ट्ये आहेत, जी स्वदेशी युद्धनौकांच्या पुढील पिढीचे प्रतिबिंब आहे.