| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. १९ जानेवारी २०२५
डॉक्टर म्हणजे देवदूत असे आपण म्हणत असतो. मरणाच्या दारातून रुग्णांना परत आणण्याची किमया हे डॉक्टर करीत असतात. मुख्यतः आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि अधिक तर ऍलोपॅथी डॉक्टर म्हणून आपण यांना ओळखत असतो. पण पुण्यात एक अशी वल्ली आहे, जी लाखो रुपयांची नोकरी सोडून रस्त्यावरील भिकाऱ्यांसाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता 'आरोग्य दान' देत असते.
आणि या वल्लीचं नाव आहे डॉक्टर अभिजीत सोनवणे... गेली अनेक वर्षे डॉ. सोनवणे हे कार्य करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. समाजातील दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून या भिकाऱ्यांसाठी ते औषधे आणि प्रसंगी अन्नदानही करीत असतात... काही भिकाऱ्यांना त्यांनी भिक मागण्यापासून परावृत्त केले असून, त्यांना कामधंद्याला लावले आहे...
त्यांच्या कार्याची ओळख, डॉक्टर सारिका रानडे यांनी घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीतून... खालील लिंक वर क्लिक करून आपण वाचकांनी ही मुलाखत अवश्य ऐकावी...