yuva MAharashtra संतोष देशमुख खून प्रकरणी केज कोर्टात कलाटणी, कराड वर खुनाचा गुन्हा होऊ शकत नाही ?

संतोष देशमुख खून प्रकरणी केज कोर्टात कलाटणी, कराड वर खुनाचा गुन्हा होऊ शकत नाही ?

फोटो सौजन्य  - गुगल फोटो गॅलरी

| सांगली समाचार वृत्त |
केज - दि. १६ जानेवारी २०२५

संपूर्ण महाराष्ट्राचे राजकीय वातावरण ढवळून काढणाऱ्या, बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच यांच्या हत्या प्रकरण धक्कादायक वळण घेण्याची शक्यता निर्माण होत आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याच्यावर आज येथील न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्या वेळच्या युक्तीवादात कराड याच्या वकिलानी, या प्रकरणात अटकेत असलेल्या कोणत्याही आरोपीने वाल्मिक कराड याचे नाव घेतलेले नाही, असे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर, सुनावणीच्या वेळी कोर्टाने तपास अधिकाऱ्यांना प्रश्न केला की फक्त फोन कॉल च्या आधारावरच वाल्मिक कराडला आरोपी बनवलं आहे का ? वाल्मिक कराड याच्या वकिलांचा युक्तिवाद आणि कोर्टाचा तपास अधिकाऱ्यांना प्रश्न... यामुळे हे प्रकरण एका नव्या वळणावर पोहोचले आहे.

दरम्यान बीड पोलीस, सीआयडी आणि एसआयटी अशा तपास यंत्रणा समोर मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी वाल्मिक कराड  याचा सुदर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे यांचा संबंध सिद्ध करण्याचे मोठे आव्हान आहे. त्याचप्रमाणे वाल्मिक कराडच्या मालमत्तेचा संबंध, महाराष्ट्राचे मंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय धनंजय मुंडे यांच्याशी जोडला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. वरील आरोपींबरोबरच वाल्मिक कराड याचा धनंजय मुंडे यांच्याशीही संबंध पोलीस यंत्रणांना सिद्ध करावा लागणार आहे.


या प्रकरणातील संशयित वाल्मीक कराड हा सध्या खंडणी प्रकरणातही पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्यावर मोका लावण्यात आला आहे. कोर्टात आणि तपासात हे प्रकरण लवकरात लवकर निकालात काढण्याचे आव्हानही पोलीस आणि न्यायालय यांच्यासमोर आहे. 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण अधिकच चिघळत चालले असून, या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या बरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही चिखलफेक होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक आहे आरोपीला सोडण्यात येणार नसल्याचे जाहीर केले आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तपास यंत्रणावर विश्वास व्यक्त करीत, यातील आरोपींना मोठ्यात मोठी शिक्षा होईल असे सांगितले आहे.

दिवंगत संतोष देशमुख आणि मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांच्या वरून एकमेकांचे समर्थक आरोप प्रत्यारोप करीत आहेत. दरम्यान या प्रकारात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उडी घेतल्याने हे प्रकरण अधिकच तापले आहे. संतोष देशमुख यांचे बंधू आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही जोरदार आघाडी उघडली आहे. त्यामुळे सरकार पक्षाची गोची झाली असून पोलीस आणि तपासणी यंत्रणांना सतर्क राहून, लवकरात लवकर हे प्रकरण निकालात काढण्यासाठी आपले कसब पणाला लावावे लागणार आहे.