| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ७ जानेवारी २०२५
आज सांगली मिरज रोडवर सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशाने विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. विजयनगर चौक ते भारती विद्यापीठ पर्यंतच्या डिव्हायडर तसेच मालबंगला परिसर मधील स्वच्छता करण्यात आली आहे.
कुपवाड विभागीय कार्यालय कडील सर्व वार्डाच्या कर्मचाऱ्यांकडून विशेष स्वच्छता मोहीम करून घेण्यात आली. यावेळी सदर ठिकाणी ११ टन कचरा काढण्यात आला.
सांगली महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी संपूर्ण महापालिका क्षेत्र कचरा मुक्त करण्यासाठी जोरदार भीम हाती घेतली असून, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांबरोबर दररोज एका भागातील कचरा निर्मूलन करण्यात येत आहे. या अभियानाबद्दल सांगली महापालिका क्षेत्रातील नागरिकांकडून आयुक्त शुभम गुप्ता, सहभागी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
या स्वच्छता अभियानात वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील, स्वच्छता निरीक्षक सिद्धांत ठोकळे, विकास कांबळे, गणेश धोतरे, अंजली धोतरे मुकादम प्रकाश चव्हाण, सागर मद्रासी, अनिल पवार, बाबासाहेब गायकवाड यांनी सहभाग घेतला.