| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ जानेवारी २०२५
सांगली मिरजेतील नागरी वस्तीत अनेक ठिकाणी वाहनांमध्ये बेकायदा घरगुती गॅस रिफिलिंग करण्याचे धोकादायक प्रकार सुरू आहेत. याप्रकरणी कडक कारवाई करण्याचे प्रशासनाकडून तंबी देण्यात आली होती. मात्र तरीही असे अनेक प्रकार सांगली मिरजेसह कुपवाड मध्ये अनेक ठिकाणी सर्रास सुरू होते.
निरं शहरातील दिंडी वेस मालगाव मार्गावरील मनेर स्क्रॅप दुकानासमोर एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदा गॅस रिफिलिंग सुरू करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने येथे छापा टाकून एक ऑटो रिक्षा, सहा घरगुती गॅस सिलेंडर, इलेक्ट्रिक वजन काटा, इलेक्ट्रिक मोटार, रेग्युलेटर, नोझल असा एकूण एक लाख छत्तीस हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी दिनेश अशोक टाकवडे (वय 34 रा. पाटील गल्ली, मिरज), आणि संजय बाबासाहेब शेळके )वय 38 दुर्गामाता कॉलनी, मिरज) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
मिरज शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आलेल्या पथकामध्ये मिरज तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक हनुमंत पाटील, निलेश कदम, झाकीर हुसेन काझी, दत्तात्रय फडतरे, अजित अस्वले, दीपक परीट, प्रकाश कौलापुरे यांचा समावेश आहे.