| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ जानेवारी २०२५
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे प्रभारी मुख्य स्वच्छता अधिकारी युनूस बारगीर हे आपल्या 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून आज सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्ती निमित्त महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्री शुभम गुप्ता आणि उपायुक्त वैभव साबळे यांच्या हस्ते युनूस बारगीर यांचा सत्कार करीत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
गेल्या 35 वर्षापासून युनूस बारगीर हे तत्कालीन नगरपालिकेपासून सेवेत आहेत. आरोग्य विभागात स्वच्छता निरीक्षक ते आता मुख्य स्वच्छता अधिकारी या पदापर्यंत त्यांनी काम केले. 35 वर्षात त्यांनी निस्वार्थी आणि निष्कलंक अशी सेवा बजावत सर्वांना मार्गदर्शनही केले. त्यांचा शासकीय सेवा कालावधी 31 डिसेंबर 2024 रोजी संपत असल्याने आज महापालिकेकडून त्यांना आज निरोप देण्यात आला.
यावेळी आयुक्त शुभम गुप्ता यांनी युनूस बारगीर यांचा सत्कार केला. कार्यक्रमास वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील यांच्यासहित महापालिकेचे सर्व स्वच्छता निरीक्षक मुकादम स्वच्छता कर्मचारी महापालिका कर्मचारी तसेच युनूस बारगीर यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.