| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २० जानेवारी २०२५
बदलापूरच्या शाळेत चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटर प्रकरणात 5 पोलीस जबाबदार असल्याचे मुंबई उच्च न्यायालायाने म्हटले आहे.जबाबदार असणाऱ्या पाच पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालाने दिले आहेत. अक्षय शिंदेंच्या आई वडिलांनी एन्काऊंटर विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आता न्यायालायाने महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने वरील निर्देश दिले आहेत. न्यायालयीन चौकशीचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे. त्यावर उच्च न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवलं आहे.
बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिन्टस आढळले नाहीत
अक्षय शिंदेवरील चौकशी अहवालात बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिन्टस आढळले नाहीत असं फॉरेन्सिकच्या अहवालात म्हटलं आहे. अक्षय शिंदेला दुसऱ्या प्रकरणात तळोजा कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर अन्य तुरुंगात नेत असताना वाटते एन्काऊंटरमध्ये त्याचा मृत्यू झाला होता. अक्षय शिंदे (24) याला ऑगस्ट 2024 मध्ये बदलापूर येथील शाळेच्या शौचालयात दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. तो शाळेत परिचर होता. सप्टेंबरमध्ये तळोजा कारागृहातून चौकशीसाठी नेत असताना चकमकीत शिंदेचा मृत्यू झाला.
गुन्हा दाखल करून कारवाई करा
न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने सांगितले की, व्हॅनमध्ये उपस्थित असलेले पाच पोलिस आरोपीच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा निष्कर्ष न्यायदंडाधिकारी दिले आहेत. त्यामुळे कायद्यानुसार पाच पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांना या प्रकरणाचा तपास कोणती तपास यंत्रणा करेल हे दोन आठवड्यांत खंडपीठाला सांगण्यास सांगितले आहे. आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा दावा संशयास्पद आहे. तसेच बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे नाहीत, असं या अहवालात म्हटलं आहे.
अक्षय शिंदेचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू
बदलापूरच्या एका संस्थेच्या शाळेत दोन चिमुरड्यांवर अत्याचार केल्या प्रकरणी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती. ठाणे पोलिसांच्या सीआययू यूनिटच्या पोलिसांनी तळोजा जेलमधून ताब्यात घेतलं होतं. मुंब्रा बायपास येथे पोहोचल्यावर अक्षय शिंदेनं पोलिसांकडून रिवॉल्वर हिसकावून घेत गोळीबार केला. त्यानं तीन राऊंड फायर केले त्यापैकी एक गोळी एपीआय निलेश मोरे यांना लागल्याचं सांगण्यात आलं. यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे जखमी झाला आणि त्याला कळवा येथील रुग्णालयात नेण्यात आलं तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं.