yuva MAharashtra सांगली जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी !

सांगली जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी !

फोटो सौजन्य - dreamstime.com

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २८ जानेवारी २०२५

क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या उत्कृष्ट खेळाडू आणि मार्गदर्शक यांना प्रोत्साहित करण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत विविध पुरस्कार देण्यात येत असतात. यामुळे नवनवीन खेळाडू व प्रशिक्षक पुढे यावेत हा उदात्त हेतू आहे. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडू आणि क्रीडा मार्गदर्शक यांना गौरवण्यासाठी क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली येथे बंद लिफाफ्यात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणांतर्गत, जिल्हा क्रीडा पुरस्कार योजना राबवली जाते. या अंतर्गत, 2023-24 या वर्षासाठी सांगली जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडू (पुरुष, महिला, दिव्यांग) आणि गुणवंत क्रीडा मार्गदर्शक अशा चार पुरस्कार देण्यात येणार आहेत.


मान्यताप्राप्त क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनी आणि मार्गदर्शकांनी अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातून प्राप्त करून घ्यावेत. हे कार्यालय सांगली-मिरज रोडवरील जिल्हा क्रीडा संकुलात, कृपामाई हॉस्पिटलसमोर आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी थेट संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.