yuva MAharashtra 2 फेब्रुवारी रोजी तासगाव येथे नववे प्रतिष्ठा राज्यस्तरीय साहित्य संमेलन, प्रतिष्ठा पुरस्काराचेही वितरण होणार !

2 फेब्रुवारी रोजी तासगाव येथे नववे प्रतिष्ठा राज्यस्तरीय साहित्य संमेलन, प्रतिष्ठा पुरस्काराचेही वितरण होणार !

फोटो सौजन्य  - दै. ललकार

| सांगली समाचार वृत्त |
तासगाव - दि. २२ जानेवारी २०२५

प्रतिष्ठा फौडेशनच्यावतीने ९ वे प्रतिष्ठा राज्यस्तरीय साहित्य संमेलन रविवार दि. २ फेब्रवारी २०२५ रोजी तासगाव येथे आयोजित केले आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे हे संमेलनाध्यक्ष आहेत. शिवाजी विद्यापीठ मराठी विभागातील ज्येष्ठ समीक्षक प्रा. रणधीर शिंदे हे उद्धघाटक आहेत. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थ सचिव प्राचार्य डॉ. मिलींद हुजरे हे स्वागताध्यक्ष आहेत तर कवी समेलनाच्या अध्यक्षपदी जगदूरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या सांगली जिल्हा उपाध्यक्ष प्रतिथयश गझलकार कवयित्री मनिषा रायजादे या आहेत. प्रतिष्ठा पुरस्कार प्रदान सोहळा, कवी संमेलन असे भरगच्च संमेलन होणार आहे, अशी माहिती संमेलनाचे निमंत्रक प्रतिष्ठा फौंडेशनचे अध्यक्ष तानाजीराजे जाधव यांनी दिली.

तानाजीराजे जाधव म्हणाले, शिक्षणाची गंगोत्री अखंड वाहती ठेवण्यासाठी गेली चाळीस वर्षे सरस्वतीची सेवा करणारे डॉ. माणिकराव साळुंखे म्हणजे सांगलीचा अभिमानच. पलूस तालुक्यातील धनगावचे डॉ. साळुंखे यांचा शिक्षण क्षेत्रातील प्रवास दिमाखदार आणि अत्यंत प्रेरणादायी आहे. शिक्षणाने माणसाचा कायापालट होतो याचे नेमके उदाहरण डॉ. साळुंखे यांनी आपल्या कामगिरीने नव्या पिढीपुढे ठेवले आहे. २००४ ते २००९ दरम्यान शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून नियुक्ती झाली. २००९ मध्ये राजस्थानच्या केंद्रीय विद्यापीठाचे पहिले कुलगुरु झाले. या विद्यापीठाला निश्चित शैक्षणिक दिशा देण्याची मैलाचा दगड ठरणारी कामगिरी केली. 


त्यानंतर डॉ. माणिकराव साळुंखे यांनी, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून जबाबदारी स्वीकारली. देशातील विद्यापीठांची सर्वोच्च संस्था असलेल्या असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या अध्यक्ष पदापर्यंत त्यांनी मजल मारली. कधीकाळी या संस्थेचे अध्यक्षपद डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉक्टर झाकीर हुसेन यांच्यासारख्या दिग्गजानी भूषवले होते. त्या संस्थेची धुरा सांभाळण्याचा बहुमान सांगलीच्या सुपुत्राला मिळाला आहे. सध्या ते भारती अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहत आहेत. पलूससारख्या ग्रामीण भागातून आलेल्या डॉ अनेक राव साळुंखे यांची ही मजल सांगलीकरांसाठी निश्चितच अभिमानाची बाब ठरली आहे.

नवव्या प्रतिष्ठा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. साळुंखे अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे प्रतिष्ठा साहित्य संमेलनाची उंची वाढली आहे. तानाजीराजे जाधव पुढे म्हणाले, उद्घाटक म्हणून लाभलेले ज्येष्ठ समीक्षक प्रा. रणधीर शिंदे यांनी शेकडो पुस्तकांची समीक्षणे लिहून मराठी साहित्य क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटविला आहे. मराठी साहित्य क्षेत्राला त्यांनी अधीकच प्रगल्भता प्राप्त करून दिली आहे.