| सांगली समाचार वृत्त |
संगली - दि. ७ जानेवारी २०२५
रविवार दिनांक 5 जानेवारी रोजी संपूर्ण देशभर भारतीय जनता पक्षाच्या वतीने सभासद नोंदणी मोहीम चालू करण्यात आली. सांगली विधानसभा आणि मिरज विधानसभा क्षेत्रात सुद्धा काल दिवसभर विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर सदस्य नोंदणी अभियान राबवले. आमदार सुधीर दादा गाडगीळ व आमदार सुरेश भाऊ खाडे तसेच जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे व प्रकाश ढंग यांच्या नेतृत्वाखाली सांगली आणि मिरज शहरात विविध ठिकाणी सदस्यता मोहीम राबवण्यात आली.
मारुती चौक, विश्रामबाग, कुपवाड, ब्राह्मणपुरी मिरज, मिरज मार्केट या ठिकाणी चौका चौकात कार्यकर्त्यांनी उत्साहाने सभासद नोंदणी केली. सांगली आणि मिरज शहरामध्ये दिवसभरात सोळा हजार सभासद नोंदणी झाली. या मोहिमेमध्ये सांगली मध्ये, प्रकाश तात्या बिर्जे, पृथ्वीराज भैय्या पवार, नितीन राजे शिंदे, स्वातीताई शिंदे, केदार खाडिलकर ,अविनाश मोहिते सुबराव मद्रासी
उदय मुळे,भारती दिगडे, माधुरी वसगडेकर, स्मिता शिंदे, तर मिरजेमध्ये मकरंद देशपांडे, सुरेश आवटी, मोहन वाटवे, पांडुरंग कोरे, भैय्या खाडीलकर,गणेश माळी त्यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सदर सदस्यता नोंदणी अभियान 12 जानेवारी पर्यंत चालू राहणार असून तोपर्यंत सभासद नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल असे प्रकाश ढंग यांनी सांगितले.