yuva MAharashtra संत शिरोमणी आचार्य श्री 108 विद्यासागरजी मुनीमहाराज यांच्या प्रथम समाधी स्मृती महोत्सवानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन !

संत शिरोमणी आचार्य श्री 108 विद्यासागरजी मुनीमहाराज यांच्या प्रथम समाधी स्मृती महोत्सवानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन !


| सांगली समाचार वृत्त |
जयसिंगपूर - दि. ३१ जानेवारी २०२५

संतशिरोमणी आचार्यश्री 108 विद्यासागरजी महामुनिराज यांच्या प्रथम समाधी स्मृती महामहोत्सव निमित्त जयसिंगपूर येथील शांती विद्या ज्ञान संवर्धन संस्थेमार्फत मंगळवार दि 4 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता खुला गट वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

या स्पर्धेसाठी खालील प्रमाणे विषय आहेत
1. आचार्यश्री विद्यासागरजी महाराज - जीवन व कार्य 
2. जैन तत्वज्ञानाचे आधुनिक शिल्पकार - आचार्य विद्यासागर 
3. आचार्य विद्यासागरजी - अहिंसा व करूणेची प्रयोगशाळा 
4. आचार्य विद्यासागर - संत ते संतशिरोमणी 
5. आचार्य विद्यासागर महाराजांचे राष्ट्रभाषेच्या समृद्धीतील योगदान 
6. समकालीन हिंदी साहित्यातील आचार्यश्री विद्यासागर महाराजांचे योगदान 
7. आचार्य विद्यासागर - अध्यात्म जगण्याची समृद्ध वाट 

*पारितोषिके*
1. प्रथम क्रमांक - 11111/-
स्व. बबन आण्णू मादनाईक यांचे स्मरणार्थ

2. द्वितीय क्रमांक - 7777/-
 श्रीमती विमल बापू नेंदूर्गे जयसिंगपूर यांचेकडून 

3. तृतीय क्रमांक - 5555/-
कु. सुमेरू सचिन पाटील जयसिंगपूर यांचेकडून 

4. चतुर्थ क्रमांक - 3333/-
सौ सरोजनी पायगोंडा सांगले जयसिंगपूर यांचेकडून 

5. पाचवा क्रमांक - 2222/-
कु. अन्वी अजय शेडबाळे संभाजीपूर यांचेकडून 


तरी या वक्तृत्व स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन आचार्यश्रींच्या प्रति आपल्या भावना व्यक्त करावे, असे आवाहन संस्था चालकांनी केले आहे.

स्पर्धेसाठी नाव नोदणी अंतिम दिनांक 1 फेब्रुवारी 2025 असून, श्री.1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिर, मादनाईक मळा,जयसिंगपूर येथे स्पर्धा होणार आहेत. याकरिता श्री. राजगोंडा पाटील (मो. 9423043225) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शांती विद्या ज्ञान संवर्धन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.