| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ जानेवारी २०२५
सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी '१०० दिवस उपक्रम' या अंतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका सर्व विभाग प्रमुख यांना आदेश देऊन प्रशासन गतिमान करण्यासाठी सर्वांनी कामकाज करण्याबाबत सूचित केले आहे. यामध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. काल दि १५ जानेवारी २५ रोजी सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिकेच्या, मिरज व कुपवाड येथील विभागीय कार्यालयामध्ये "१००दिवस उपक्रम" अंतर्गत करावयाच्या उपक्रमाबाबत उप आयुक्त विजया यादव यांनी विविध खाते प्रमुख यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
नागरिकांना शासकीय सेवा आणि सुविधा उपलब्ध करून देत असलेली माहिती आता वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे. केंद्रीय माहिती अधिकार २००५, लोकशाही दिन, शासकीय पत्र व्यवहार, पोर्टल वरील पत्र व्यवहार, नागरिकांच्या तक्रारी, इत्यादी माहिती प्रसिध्द करणे आवश्यक आहे. या उपक्रमात त्या बाबत नागरिकांना माहिती अद्यावत होणार आहे. महानगरपालिकेचे कार्यालय व परिसर या पुढे स्वच्छता ठेवण्यात येणार आहे. नागरिकांना सेवासुविधां अंतर्गत नवीन उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नागरिकांना माहिती वेळेत मिळावी, मदत मिळावी. या बाबत मदत केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. असे अनेक नवीन उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
नागरिकांसाठी विविध कार्यालयात प्रतिक्षा कक्ष तयार करणे, बैठक व्यवस्था, पिण्याचे पाणी अशा सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कार्यालयीन कामकाज गतिमान होण्यासाठी सर्व खाते प्रामुख्याने या पुढे पुढाकार घेऊन कामकाज करावे लागणार आहे, आपल्या विभाग मधील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी नियोजन करून कामकाज करावी लागणार आहे.
या बैठकीत उप आयुक्त विजया यादव यांनी सर्वांना सदरचा उपक्रम यशस्वी राबविण्यासाठी मार्गदर्शन केले. या वेळी सहा. आयुक्त अनिस मुल्ला, सचिन सागावकर, डॉ रविंद्र ताटे, मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद, नगररचनाकार पंकजा रुईकर, स्वच्छता निरीक्षक विकास कांबळे, सचिन वाघमोडे, मिरज विभागीय कार्यालयामधील खाते प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.