| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ जानेवारी २०२५
एकीकडे शासनाच्या विविध योजनांमुळे सांगलीची एसटी बस कधी नव्हे ती फायद्यात धावत आहे. परंतु बस, आणि अनियंत्रित वेळापत्रक यामुळे याला खूप बसत होता. परंतु शासनाने संपूर्ण राज्यातील एसटी आगाराम प्रमाणेच सांगली एसटी आगारालाही 100 नव्या बसेस तसेच 120 इलेक्ट्रॉनिक बसेस आहे देण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या सांगलीचे मध्यवर्ती बस स्थानक नूतनीकरणाने सजत आहे. प्रवाशांची वाढलेली वर्दळ आणि प्रतिसाद पाहता, जुनाट झालेल्या एसटी बसेस भंगारात घालून नव्या एसटी बसेस देण्याची अनेक वर्षांची मागणी आता पूर्ण होत आहे. सध्या आगाराला 200 बसेसची आवश्यकता असली तरी प्रवाशांना तूर्तास शंभर नव्या बसेस वर समाधान मानावे लागणार आहे. मात्र त्याचवेळी 120 इलेक्ट्रॉनिक्स बसेस सांगली आगाराला देण्यात येणार आहेत.
सांगली प्रमाणेच मिरज आणि विटा येथे अत्याधुनिक बस स्थानकांच्या इमारती उभारण्यात येत आहेत. तब्बल नऊ वर्षानंतर सांगलीची एसटी फायद्यात आली आहे. सांगली आकारासाठी दोन कोटी रुपये खर्चून नूतनीकरण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मिरज आणि विटा येथील मुख्य बस स्थानक अत्याधुनिक पद्धतीने उभारले जात आहे यामध्ये सुसज्ज कॅन्टीन, विश्रामगृह, पार्किंग सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. याचबरोबर बसेसचे सुयोग्य नियोजन आणि बस स्थानकात स्वच्छता राखण्याबरोबरच व प्रवाशांना सुविधाही देण्यात येणार आहेत. यामुळे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर प्रवासी एसटी बसेस कडे वळतील असा महामंडळाचा विश्वास आहे.