yuva MAharashtra ९ वी तील विद्यार्थ्यांना ISRO च्या YUVIKA या 15 दिवशीय मोफत निवासी कॅम्प मध्ये सहभागाची संधी ?

९ वी तील विद्यार्थ्यांना ISRO च्या YUVIKA या 15 दिवशीय मोफत निवासी कॅम्प मध्ये सहभागाची संधी ?


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १४ डिसेंबर २०२
प्रतिवर्षी ISRO व्दारे में महिन्यात देशभरातील प्रज्ञावंत मुलांची निवड युविका Camp साठी केली जाते. निवड झालेल्या मुलांचा जाण्या येण्यापासून निवास, जेवण वगैरे खर्च ISRO तर्फे केला जातो. Space Technology बद्दल विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिका व्दारे माहिती दिली जाते. Rocket Launching देखिल मुलांना प्रत्यक्ष पहाता येते. ISRO Chairman शी संवाद साधण्याची मिळते मुलांना संधी.

निवड करताना 8वीचे गुण, विद्यार्थ्यांनी Science, Sports Competitions, NCC वगैरे मध्ये घेतलेला सहभाग विचारात घेतला जातो. महत्वाचे म्हणजे निवड करताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 15% गुण अधिक दिले जातात. याबद्दल माहिती नसल्यामुळे ग्रामीण भागातील बहुतेक विद्यार्थी यापासून वंचित राहतात.

यंदा ज्यांची मुले यंदा नवव्वीत आहेत त्यांनी यांचा जरूर विचार करावाच त्याबरोबर हि माहिती आपल्या संपर्कातील सर्वाना जरूर द्यावी.


सध्या बहुतेक ठिकाणी तालुकास्तरीय Sports, Science Competition चालू आहेत, त्यामध्ये मुलांना सहभागी होण्यास प्रोत्साहन द्या त्याचा फायदा आपल्याला YUVIKA मध्ये निवड होताना नक्कीच होईल.आवश्यक कागदपत्रे

1) 8th Markslilst

2) NCC,MCC certificate(असल्यास)

3) Sports Achievement (असल्यास)

4) Science Competition Certificate (असल्यास)

गेल्या दोन वर्षांत गोवा व महाराष्ट्रातील 25 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला यामध्ये Kendriya Vidyalaya तील विद्यार्थ्यांचा देखिल समावेश आहे.

मात्र विद्यार्थी नोंदणी न केल्यामुळे या संधीपासून वंचित राहतात.

काही मदत पाहिजे असल्यास जरूर खालील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.

Eureka India 
9604150589