yuva MAharashtra डॉ. आंबेडकर या॔च्यावरील विधानावरून विरोधी पक्षांनी घेरल्यानंतर भाजपा ॲक्टिव्ह मोडवर, शाह यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक !

डॉ. आंबेडकर या॔च्यावरील विधानावरून विरोधी पक्षांनी घेरल्यानंतर भाजपा ॲक्टिव्ह मोडवर, शाह यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक !


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १९ डिसेंबर २०२
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधानावरील चर्चेदरम्यान राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या तथाकथित विधानावरून विरोधी पक्षाकडून शाह यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. राज्यसभेसह लोकसभेतही विरोधी पक्षांनी याबाबत जोरदार आवाज उठवला आहे. त्याचप्रमाणे एक क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्याद्वारेही अमित शाह यांना टार्गेट केले जात आहे. 

यामुळे आता भाजप ॲक्शन मोडवर आली असून, अमित शाह यांनीही भाजपच्या एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले. यामध्ये विरोधी पक्षाकडून करण्यात येत असलेल्या अमित शाह यांच्या वक्तव्याचा विपर्यासाबाबत सविस्तर चर्चा करण्यात येऊन, या फेक नरेटीव बाबत जोरदार प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


या संपूर्ण प्रकरणात केंद्र सरकारही अमित शाह यांच्या बाजूने उभे राहिले असून राज्यसभेतील संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी हल्लाबोल करीत काँग्रेस या संपूर्ण प्रकरणात ड्रामेबाजी करीत असल्याचा आरोप केला. यावेळी बोलताना ते म्हणाले की भाजपा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर हे संपूर्ण देशाला ठाऊक आहे परंतु गृहमंत्री अमित शाह यांच्या छोट्या क्लिपचा आधार घेत त्यांचे वक्तव्य अर्धवट सादर करून गैरसमज पसरवला जात आहे. काँग्रेसच्या या ड्रामेबाजी आणि नौटंकीचा आपण निषेध करीत असल्याचेही रिजीजू यांनी यावेळी म्हटले आहे.

भाजपाची सोशल मीडिया टीमही अमित शाह यांच्या कथितरीत्या वक्तव्याचा विपर्यास करण्या विरोधात उभी राहिली असून, वस्तुनिष्ठ व्हिडिओसह सोशल मीडियावर अमित शाह यांचे समर्थन करण्यात येत असून, काँग्रेसच्या फेक नरेटिव्हबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

दरम्यान अमित शाह यांच्या कथेत वक्तव्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी पक्षाकडून जोरदार हंगामा करण्यात आला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अमित शाह यांच्या राजीनामेचे मागणी केली आहे. विरोधी पक्षाच्या जोरदार गोंधळानंतर संसदेचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे.