yuva MAharashtra चडचण येथील पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना धाक दाखवून लुटलेल्या टोळक्याच्या पोलिसांनी जाळ्यात आवळल्या मुसक्या !

चडचण येथील पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना धाक दाखवून लुटलेल्या टोळक्याच्या पोलिसांनी जाळ्यात आवळल्या मुसक्या !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २१ डिसेंबर २०२
जत तालुक्यातील गिरगाव ते चडचण मार्गावर धाक दाखवून एक लाख पंधरा हजार रुपयांची रोकड लुटणाऱ्या पाच संशयितांपैकी एका आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी एकाला गजाआड केले. या गुन्ह्यातील चौघेजण फरार असून पोलीस त्यांच्या शोधात आहेत. सचिन परशुराम कांबळे (वय 24, रा. लवंगा, ता. जत) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी कांबळे याला अटक केल्यानंतर त्याने सुनील तानाजी लोखंडे, सचिन महादेव बिराजदार-पाटील, परशुराम कांतु कांबळे, हंजाप्पा मांग (सर्व रा. लवंगा) अशी फरार झालेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की कर्नाटकातील इंडी पतसंस्थेच्या चडचण शाखेमध्ये श्रीधर सुब्बाराव बगली, कर्जाचे थकलेले हप्ते वसूल करण्याचे काम करतात तर व्यंकटची हे मॅनेजर म्हणून काम पाहतात. बुधवार दिनांक 4 डिसेंबर रोजी जत तालुक्यातील गिरगाव मधील कर्जदारांकडून हप्ते वसूल करून चडचणकडे चालले होते. सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास संशयतांनी दोघांना वाटत अडवून त्यांच्या मिरची पूड टाकली व चाकूचा धाक दाखवत दोघांकडील पैशाची बॅग घेऊन पळून गेले होते. याबाबत उमदी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.

या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पथकातील कर्मचारी नागेश खरात यांना माहिती मिळाली की, लवंगा गावातील सचिन कांबळे, सचिन बिराजदार पाटील यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने सदरचा गुन्हा केला आहे. त्यापैकी कांबळे हा कोत्याव बोबलाद गावातील चौकात थांबलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी छापा टाकून कांबळे याला जेरबंद केले. त्याच्याकडे गुन्ह्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा मान्य करून अन्य साथीदारांची नावे पोलिसांना दिली. यावेळी कांबळे याला ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी उमदी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक निरीक्षक पंकज पवार संदीप कांबळे संदीप गुरव नागेश खरात, सतीश माने, दरिबा बंडगर, अमर नरळे, विक्रम खोत यांच्या पथकाने केली आहे.